पद्मविभूषण शरदचंद्र पवार पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
Election of Padma Vibhushan Sharad Chandra Pawar Credit Union unopposed
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir20Jan23 , 17.20 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहातील प्रगतीपथावर असलेल्या पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली आहे.
पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य असणा-या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेची २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी होणारी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणुकीत ११ जागेसाठी ११ आल्याने निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नामदेवराव ठोंबळ यांनी जाहीर केले .
निर्वाचित सदस्य रावसाहेब चौधरी, देवेंद्र रोहमारे, अनिल महाले, महेंद्र काळे, सुदाम वाबळे, व्यंकटेश बारहाते, बन्सी निकम, सौ. परवीन सय्यद, सौ. मेघा कडवे, वीरेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर हाळनोर या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या सर्वांचे माजी आमदार अशोक काळे व आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत





