क्रीडा क्षेत्रातील जनरल चॅम्पियन संजीवनी पॉलिटेक्निक सहा जिल्ह्यात अव्वल
Sanjeevani Polytechnic, the general champion in sports, topped six district
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon23Jan23 , 18.20 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगांव: महाराष्ट्र राज्याच्या वतीने संजीवनी के बी पी पॉलिटेक्निकच्या मैदानावर इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस असोसिएशन (आयईडीएसएसए), डब्ल्यु ५ झोन अंतर्गत मुलींच्या विविध हिवाळी क्रीडा स्पर्धेत जनरल चॅम्पियन ठरलेल्या संजीवनी पॉलिटेक्निक ने सहा जिल्ह्यात अहवाल स्थान पटकवून एक नवीन कीर्तीमान स्थापित केल्याची माहिती पॉलिटेक्निकने प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली
पत्रकात पुढे म्हटले आहे की डब्ल्यु ५ झोन अंतर्गत अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक , धुळे, जळगांव आणि नंदुरबार या सहा जिल्ह्यात झालेल्या कबड्डी, खो-खो, व्हाॅलीबाॅल, बास्केटबाॅल, चेस, कॅरम, बॅडमिंटन, रनिंग (१००, २००, ४०० आणि ८०० मीटर), १०० मी बाय ४ रिले, जावेलिन थ्रो, डिस्क थ्रो, लाॅंन्ग जम्प, ट्रिपल जम्प व शॉट पुट अशा एकुण १८ क्रीडा प्रकार स्पर्धेत सहा जिल्ह्यातील सहभागी ३८ पाॅलीटेक्निकच्या ८५० मुलींनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदविला होता.
——-
चौकट
संजीवनी मध्ये भारताचे सक्षम, संपन्न, सजग आणि सतर्क नागरीक घडविण्यासाठी शैक्षणिक , क्रीडा, सांस्कृतिक, प्रयोगशिलता, आधुनिक अद्ययावत ज्ञान, यावर भर देण्यात येवुन सातत्याने प्रयत्न केले जात असल्याने ग्रामीण भागातील मुलींनी राज्य पातळीवरील क्रिडाक्षेत्रातील यशाच्या जोरावर सरकारी नोकऱ्या प्राप्त केल्या आहेत, ही संजीवनीच्या दृष्टीने मोठी उपलब्धी असून माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक कै. शंकरराव कोल्हे यांनी ४० वर्षांपूर्वी ग्रामिण भागातील मुलां-मुलींसाठी पाहीलेले प्रगतीचे स्वप्न सत्यात उतरत असल्याची संजीवनी पाॅलीटेक्निकला मिळालेली जनरल चॅम्पियनशिप ही सर्व प्रकारच्या प्रयत्नांची पुष्टी आहे. – अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी
——————-
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व विजयी व सहभागी खेळाडू विध्यार्थींनी, प्राचार्य ए. आर. मिरीकर, स्पर्धांच्या समन्वयक प्रा. मोहिनी गुंजाळ, सर्व विभाग प्रमुख, सर्व क्रीडा शिक्षक गणेश नरोडे, शिवराज पाळणे, परीमल कचरे, अक्षय येवले व करण भांभू यांचे अभिंनदन केले आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व विजयी व सहभागी खेळाडू विध्यार्थींनी, प्राचार्य ए. आर. मिरीकर, स्पर्धांच्या समन्वयक प्रा. मोहिनी गुंजाळ, सर्व विभाग प्रमुख, सर्व क्रीडा शिक्षक गणेश नरोडे, शिवराज पाळणे, परीमल कचरे, अक्षय येवले व करण भांभू यांचे अभिंनदन केले आहे.





