ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व पोलीस कर्मचारी वसाहत प्रश्न मार्गी लागला – आ. आशुतोष काळे
Rural Police Station Building and Police Staff Colony Question Got Out – Aa. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon23Jan23 , 18.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व कर्मचारी वसाहतीचा प्रश्न आता मार्गी लागला आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे .
निवडून आल्यापासून केलेला पाठपुरावा फळाला आला असून ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व पोलीस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीसाठी २८.५० कोटीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत असे आ.आशुतोष काळे यांनी पत्रकात म्हटले आहे .
माजी आमदार अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव शहर व ग्रामीण असे दोन स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्माण केले होते. दोन्ही पोलीस स्टेशनच्या इमारतीपैकी शहर पोलीस स्टेशन इमारतीचे काम पूर्ण झाले असून ग्रामीण पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मात्र प्रलंबित होता. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अशीच काही परिस्थिती पोलीस कर्मचारी वसाहतीची देखील झाली होती. याची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासूनच अनेक शासकीय इमारतींच्या नुतनीकरणाबरोबरच कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीचा व कर्मचारी वसाहतीच्या नुतनीकरणाचा प्रश्न आपल्या मुख्य अजेंडयावर घेतला होता. तेव्हापासून तात्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या गृह आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
त्यानुसार ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व पोलीस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीसाठी २८.५० कोटीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निधीतून ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत,२ बीएचके ५६ कर्मचारी फ्लॅट, ३ बीएचके ०८ फ्लॅट, संरक्षक कंपाऊंड, पार्किंग व्यवस्था, वसाहतीच्या अंतर्गत रस्ते, ड्रेनेज सुविधा, लँडस्केपींगसह ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व कर्मचारी वसाहतीसाठी सौर उर्जेचा वापर करण्यात येणार आहे. तसेच पोलीस स्टेशन फर्निचर, लिफ्ट सुविधा व सुसज्ज अग्निशमन यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.