हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरें हे प्रभावशाली व्यक्तिमत्व  -विवेक कोल्हे.  

हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरें हे प्रभावशाली व्यक्तिमत्व  -विवेक कोल्हे.

Balasaheb Thackeray, the emperor of Hindu hearts, is an influential personality – Vivek Kolhe.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon23Jan23 , 18.40 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना देश हितासाठी कोणत्याही परिणामाचा विचार न करता परखड मते मांडणारे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते मात्र त्यांचे सर्व पक्षांचे नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याचे गौरवउद्गार जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करतांना केले.

          ते पुढे म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविले. नेताजी सुभाषचंद्रजी बोस व बाळासाहेब ठाकरे हे प्रखर देशभक्त व देशहित जपणारे थोर नेते होते.,
               याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेंद्र सोनवणे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, भाजपचे  माजी गटनेते रवींद्र पाठक,  बाळासाहेब नरोडे, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, विजय आढाव, माजी नगरसेवक डॉ. अजेय गर्जे, यांच्यासह भाजप, शिवसेना, रिपाई  आदी पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Leave a Reply

You cannot copy content of this page