कोट्यावधीचे रस्ते झाले पण दर्जाचे काय ? अनेक रस्त्यावर भले मोठे खड्डे पालिकेचे दुर्लक्ष  

कोट्यावधीचे रस्ते झाले पण दर्जाचे काय ? अनेक रस्त्यावर भले मोठे खड्डे पालिकेचे दुर्लक्ष  

Millions of roads have been built, but what about the quality? There are big potholes in many roads, neglect of the municipality

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue24Jan23 , 18.40 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोट्यावधीचे रस्ते झाले मात्र त्यानंतर वर्षभरातच हा रस्ता ठिकठिकाणी उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या कामामध्ये वरचा जो सिल्कोट मारलेला आहे, त्यामध्ये डांबराचा वापर अतिशय कमी झाला आहे. तर अनेक महत्त्वाच्या रस्त्यावर डाव्या किंवा उजव्या साईडला सीलकोटचा पट्टाच मारलेला नाही.  अख्खाच्या अख्खा सिलकोट  पट्टा  खाऊन टाकला आहे.

तसेच मालाची जाडी खूपच कमी आहे. त्यामुळे रस्ता अल्पावधीतच निकामी ठरला आहे. सदर रस्त्याचे काम करताना नगरपालिका प्रशासनाने देखील अत्यंत दुर्लक्ष केले आहे. याची देखरेख व पाहणी करण्याचे काम नगरपालिकेच्या नगर अभियंता व संबंधित बांधकाम विभागाचे आहे. मात्र काम पाहता फक्त ठेकेदारांचे भले करण्यातच धन्यता मानली.

 

खड्ड्यात ट्रक आणि डंपर उतरले
हेडगेवार चौक,ते   हॉटेल वीरा पॅलेस पर्यंतचा रस्ता, अण्णाभाऊ साठे ते येवला नाका, बाबा चौक ते गोकुळ नगरी कॉर्नर, निवारा रिक्षा स्टॅन्ड ते  निवारा ट्रेडर्स  खडकी रोड,  अहिंसा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळाचौक काँक्रीट रस्ता ,  एसटी स्टँड समोरचा एरिया, तसेच पुढील सर्व भागांमध्ये हा रस्ता खूपच खराब झाला आहे. या रस्त्यांचे आयुष्य मात्र अल्पायुष्य ठरले आहे कोणी केले कधी केले का केले कसे केले या खोलात न शिरता व  कोणाच्या आंदोलनाची वाट न पाहता तातडीने पालिका प्रशासनाने त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. 
कारण डांबरीकरण करताना योग्य पद्धतीने ते झालेले नाही. ठेकेदाराची बिले मात्र अत्यंत तातडीने अदा करण्यात आली आहेत.
शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा विषय उच्च न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन नगरपालिकेचे पदाधिकारी, नगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध याबाबत लवकरच याचिका दाखल होणार आहे. संबंधित ठेकेदाराने या कामात कुचराई केल्याने त्याला दिलेल्या ठेक्याच्या कराराप्रमाणे हा रस्ता पुन्हा त्याच्याकडून करून घेणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी यांनी एकदा या रस्त्याची पाहणी करून आपण मिळवून दिलेल्या निधीचा कसा गैरवापर केला गेला. याची शहानिशा करावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने दिला आहे.

चौकट

 शहरातील गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरून  ऊस वाहतूक वाळूचे डंपर यासारख्या अवजड वाहनांची २४ तास या  अवजड वाहतूक होत असते खड्ड्यामुळे ही अवजड वाहने पलटी होऊन मोठा अपघात व दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने याची प्रशासनाला गांभीर्य समजावे, जाग यावी यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी हेडगेवार चौकातील खड्ड्यात बसून वाळूचे डंपर पलटी आंदोलन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page