ठेकेदाराचे फावले;  आरोप प्रत्यारोप कार्यकर्ते  भिडले

ठेकेदाराचे फावले;  आरोप प्रत्यारोप कार्यकर्ते  भिडले

Contractor’s Shovels; Activists clashed with accusations

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue24Jan23 , 18.50 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : नगरपालिका  निवडणुका अनिश्चित असल्या तरी   एरव्ही शहरातील नगरपालिका  आणि इतर समस्यांबाबत चर्चा करणाऱ्या  प्रसिद्धी माध्यमातून  काळे आणि  कोल्हे  यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांविरोधातील जुनी प्रकरणे उकरून काढत एकमेकांच्या नेत्यांची बदनामी करण्याचे प्रकार सुरू आहेत.

 कोपरगाव शहरातील  नगर पालिकेतील विषय तसेच शहरातील समस्यांबाबत शहरातील नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे यांच्यासह व्यापारी अशा महत्त्वाच्या नागरिकांचा समावेश असलेले काही व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत. एरव्ही यावर शहरातील समस्या आणि पालिकेतील राजकारणाबाबत अनेक चर्चा रंगतात. मात्र  नगरपालिका  निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काळे आणि कोल्हे   गटाचे समर्थक  आरोप प्रत्यारोपातून एकमेकास भिडले.
एका वर्षात बस स्थानकाच्या कामाचा निकृष्ट दर्जा उघड झाला या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण असा आरोप काळे गटाकडून करण्यात आला याला उत्तर देताना लोकप्रतिनिधींना नव्या बस स्थानकाच्या उद्घाटन फोटोच्या घाई  पायीच   बस स्थानकाचे काम  निकृष्ट  झाल्याने  गज उघडे पडले पडल्याचा प्रत्यारोप  कोल्हे गटाकडून करण्यात आला.
तर दुसऱ्या प्रकरणी ४२ कोटीच्या पाणी योजनेत भ्रष्टाचाराला खतपाणी घातले नसते तर आज धरणात पाणी असताना कोपरगावकरांवर  सहा-आठ दिवसांनी पाणी देण्याची   हि वेळ कुणी आणली ? असा आरोप काळे गटाने केला त्यावर शहरातील नागरिकांवर आज जे पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे त्यास  पाणी प्रश्न सोडविण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधीची निष्क्रियताच  कारणीभूत असल्याचा पलटवार कोल्हे गटाने  केला आहे.
एकंदरीत या राजकीय साठमारीत माध्यमांवरून चिखलफेक सुरू आहे.सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येक जण आपल्या आवडत्या राजकीय नेत्याची बाजू उचलून धरताना विरोधकांवर टीकाटिप्पणी करतात; परंतु अलीकडच्या काळात टीका करताना पातळी ओलांडली जाते.खालच्या स्तराला जाऊन उणी-दुणी काढण्याचे प्रकार घडत आहेत. शहर किंवा मतदार संघाचा विकास असो तात्कालीन लोकप्रतिनिधी मोठ्या मेहनतीने निधी आणतात विकास कामे होतात परंतु त्यांच्या दर्जा गुणवत्ता याकडे मात्र कोणी लक्ष देत नाही  परिणामतः अधिकारी आणि ठेकेदार यांचे फावते; नेत्यांच्या नावाने आरोप प्रत्यारोप  करत कार्यकर्ते एकमेकांना भिडतात  विकास कामांना निधी आणणे नेत्याचे काम आहे. परंतु ते काम जर निकृष्ट दर्जाचे होत असेल तर यात नेत्यांचा काय दोष ? याचे आत्मचिंतन नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या नेत्यावर आरोप करताना केले पाहिजे.

Leave a Reply

You cannot copy content of this page