अखिल गुरव समाज संघटना; अशोक पांडे आदर्श जिल्हाध्यक्ष राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Akhil Gurava Samaj Association; Ashok Pandey Adarsh District President State Level Award
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue24 Jan23 , 20.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : नगर जिल्हा अकोला तालुक्यातील कुंभेफळ येथील अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष अशोक पांडे यांना राज्यस्तरीय आदर्श जिल्हाध्यक्ष पुरस्कार भोसरी पुणे येथील आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, शाल श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्री खंडोबा मंदिर, खंडोबा माळ, आकुर्डी, मुंबई-पुणे रोड, येथे रविवारी (२२) रोजी अखिल गुरव समाज संघटनेच्या राज्यस्तरीय वधू वर मेळाव्यात अशोक पांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या १५ वर्षापासून स्वतःचा व्यवसाय सांभाळत त्यांनी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस, राज्य कार्याध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष अशी अनेक पद भूषविले आहे. सामुदायिक व्रतबंध सोहळे, तरुण पिढीसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर, अपघातग्रस्त बांधवांना तातडीची मदत, समाज बांधवांच्या अनाथ झालेल्या मुलांना समाजाकडून निधी गोळा करून त्या मुलांच्या भावी आयुष्यासाठी थोडासा हातभार लावणे, कुणाच्याही दु:खात सहभागी होणारे, महाराष्ट्रभर दांडगा जनसंपर्क असे अनेक विधायक काम करतात. गुरव समाज संघटनेचा प्रचार व प्रसार करणारे अशोक पांडे यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने सदर पुरस्कार देण्यात आला,
पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर, पुणे जिल्हा आयोजित राज्यस्तरीय वधु-वर मेळावा, देवस्थान हक्क परिषद, नागरी सत्कार समारंभ, राज्यस्तरीय पदाधिकारी बैठक व तिळगुळ हळदीकुंकू कार्यक्रमास अखिल गुरव समाज संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.अण्णासाहेब शिंदे मावळ खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी आमदार अण्णासाहेब बनसोडे, मावळ आमदार सुनिल शेळके, आमदार श्रीमती उमा खापरे, राज्यध्यक्ष वसंतराव बंदावणे, स्वागताध्यक्ष पिंपरी चिंचवड मनपा माजी नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे, गुरव समाज राज्य महिला अध्यक्ष सौ. सुरेखा तोरडमल, वधू वर विवाह समिती राज्यध्यक्ष सौ.भाग्यश्री भालेराव, ॲड. मुकुंद आगलावे, सुरज गुरव, संजय सावंत, संगीता ठोसर (नगरसेविका पुणे) जयदीप बारभाई विरोधी पक्ष नेता, जेजुरी नगरपालिका संतोष वाघमारे (प्रदेश कार्यकारी अध्यक्ष) सौ. रूपाली बाघमारे (प्रदेश सरचिटणीस र. अ) मनोज पांडे, (पोलीस अधिकारी)- सौ. मनिषा पांडे, (प्रदेश मुख्य सरचिटणीस म् आ), संजय गुरव (जिल्हाध्यक्ष बीड) – सौ. अनिता गुरव (प्रदेश उपाध्यक्ष म.जा), हरीचंद्र धोत्रे, किरण शिर्के, डॉ. श्रीकांत बाघ मुंबई,ह. भ. प. मारुती गुरव मुंबई राम शिंदे, प्रणव गुरव,कु. ऋषीकेश श्याम इथापे, बालाजी विराजदार डॉ. संजय गुरव (शिरपूर, धुळे) गुरव मित्र पुरस्कार प्रकाश ढोरे नगरसेवक पुणे मनपा, प्रशांत गुरव, गणेश घोरपडे,रेवणसिद्ध फुलारी प्रसिद्ध गायक सारेगमप लिटल चम्प, सौ. वैजयंता शिंदे, संतोष वाघमारे, सुभाष शिंदे, या मान्यवरासह गुरव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी आभार कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष पिंपरी चिंचवड मनपा माजी नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे यांनी व्यक्त केले