कोपरगाव परिक्षापूर्वी परिक्षेवर चर्चा कार्यक्रम; चित्रकला स्पर्धेत चार हजार विद्यार्थी सहभागी
Discussion program on exam before Kopargaon exam; Four thousand students participated in painting competition
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed25Jan23 , 19.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : स्पर्धेचा युगात पराभवाला न घाबरता स्पर्धेत सहभागी होणे महत्वाचे असून विद्यार्थांनी पारितोषिक मिळाले नाही तरी नाराज न होता. सहभागी होणे महत्वाचे आहे तसेच परीक्षा बाबत तणाव न घेता त्याला समोरे जा असे सांगत विद्यार्थांना प्रेरित करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असल्याचे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी चित्रकला उद्घाटन प्रसंगी केले. .
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ पासून परीक्षेपूर्वी परीक्षा वर चर्चा या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची थेट संवाद साधत त्यांच्यावरील परीक्षेचा कालावधीत येणारा ताण तणाव कमी करण्यासाठी आपले अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे या उपक्रमाचा उद्देश होता. हा एक अतिशय उपयुक्त असा उपक्रम विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळातील ताणतणाव मुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.त्यांची संकल्पना संपुर्ण राज्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभावीपणे राबविली आहे. या कार्यक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ४हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या वेळी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख,. के. बी.पी. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश कातकडे, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरवसे ताई, कला शिक्षक अमोल निर्मळ, जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक, शहराध्यक्ष रविंद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, विजय वाजे, राजेंद्र औताडे, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते, विद्यार्थी विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
शहरासह संपुर्ण कोपरगांव विधानसभा मतदार संघात बुधवारी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर जी २० जागतिक विश्वगुरू बनण्याच्यादृष्टीने भारताची वाटचाल, आझादीचा अमृत महोत्सव, सर्जीकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणांत भारत पहिल्या कमांकावर, पंतप्रधानांच्या जनसेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योगदान, बेटी बचाव बेटी पढाओ, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला हे दहा विषय चित्रकला स्पर्धेसाठी निवडण्यांत आले होते त्यात चार हजार विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.