विकास प्रक्रियेत युवाशक्तीचा समावेश; डिजिटल इंडियाचे मोठे योगदान- विवेक कोल्हे
Inclusion of youth in the development process; Major Contribution of Digital India- Vivek Kolhe
वेस येथील काळे गटाचे कार्यकर्ते भाजपा कोल्हे गटात Activists of Kale group from Ves in BJP Kolhe group
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed25Jan23 , 19.40 PmBy राजेंद्र सालकर
कोपरगाव : युवकांनी संघटनात्मक बांधणीतुन गावचे प्रश्न सोडवावे, भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाच्या माध्यमातुन युवा शक्तीला विकासप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी मोठे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी मंगळवारी वेस येथे कोल्हे गटात कार्यकर्त्यांच्या प्रवेश प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम होते.
याप्रसंगी सर्वश्री तान्हाजी श्रीपती पाडेकर, रामनाथ निवृत्ती पाडेकर, काशिनाथ बाबासाहेब पाडेकर, बाबासाहेब बळवंत पाडेकर, दादासाहेब त्रंबक पाडेकर, शांताराम सारंगधर पाडेकर, रविंद्र उत्तम पाडेकर, प्रदिप सोमनाथ पाडेकर, आबासाहेब रामनाथ पाडेकर, दिलीप गोपिनाथ पाडेकर, विकास नवनाथ पाडेकर, नितीन कचरू पाडेकर, नामदेव कचेश्वर म्हाळसकर, शकीलभाई बशीरभाई इनामदार, मच्छिंद्र नामदेव पाडेकर, मच्छिंद्र सोपान आरणे, सचिन कचरू पाडेकर, दुर्गेश काशिनाथ पाडेकर, भिमा खंडु खडीझोड, दत्तात्रय किसन भडांगे, मारूती सोपान पाडेकर, मच्छिंद्र त्रंबक कोल्हे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटात प्रवेश केला त्याबददल त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नवनाथ आरणे, शिवाजी शेंडगे, भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक ज्ञानदेव पाराजी औताडे, कैलास राहणे, भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी त्यांच्या भाषणातुन लोकप्रतिनिधीवर टीका केली
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की,
धोंडेवाडी पाझर तलाव, काकडी विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, अतिवृष्टी अनुदान, रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, अकरा गावात विहीरी खोदाईतील अडचणी यासह असंख्य प्रश्न तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मार्गी लावले,
स्व. शंकरराव कोल्हे, बिपीनदादा कोल्हे आणि सौ. स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे धरण कालवे निर्माती संघर्षात आजवर मोठे योगदान दिले असुन त्यांचा पाठपुरावा, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे फडणवीस सरकारचे आर्थीक पाठबळावर शेतक-यांचे स्वप्न साकारले जात.असून या भागातील जिरायती शेतक-यांच्या दारात निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे आणण्याचे काम अंतिम टप्यात आहे.
ते पुढे म्हणाले, समाज माध्यमातून फसवेगिरी बाजारूपणांला उत आला आहे. युवकांसाठी संजीवनी बीपीओ कॉल सेंटर सुरू असून ९६० युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला.शेती महामंडळाच्या जागेवर कोपरगांव एम आय डी सी साठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागाची कामधेनू असलेल्या संजीवनी कारखान्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.भारतीय जनता पक्षात ज्या युवकांनी प्रवेश केला त्यांचे स्वागत असेही ते शेवटी म्हणाले.
याप्रसंगी शरद थोरात, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, अरूणराव येवले, संजय रोहमारे, आप्पासाहेब रोहमारे, नानासाहेब गव्हाणे, रमेश औताडे, एकनाथ दरेकर, गणेश नेहे, कानिफ गुंजाळ, चांगदेव पाडेकर, प्रभाकर गोसावी, राजेंद्र कोल्हे, रामदास भडांगे, सुमित कोल्हे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी प्रतिनिधी भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन आभार बाबासाहेब नेहे यांनी केले.
Post Views:
162