संजीवनी सेंद्रिय खताचा वापरातून उसाचे एकरी उत्पादन वाढवा – बिपिनदादा कोल्हे
Increase acre yield of sugarcane through application of Sanjeevani organic fertilizers – Bipindada Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed25Jan23 , 19.50 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगांव : सध्याचा काळ स्पर्धेचा आहे. शेतकरी सभासदांनी दर्जेदार उस बेणे निवडुन प्रती एकरी उस उत्पादनात वाढ करावी त्याकरीता संजीवनी सेंद्रीय खताचा वापर करावा, असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी एका कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.
बुधवारी (२५) गणेश जयंतीच्या मुहूर्तावर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सेंद्रीय खत पॅकींग मशीनचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी उस उत्पादक सभासद शेतक-यांच्या उत्पादन वाढीसाठी सर्वतोपरी अत्याधूनिक तंत्रज्ञानातून अंमलबजावणी केली असुन उस व अन्य पीक उत्पादन वाढीसाठी कारखान्याने स्वत: सेंद्रीय खताची निर्मीती केली आहे.
बिपिनदादा कोल्हे पुढे म्हणाले कार्यक्षेत्रातील उस उत्पादकांसाठी सवलतीच्या दरात सेंद्रीय खत पुरविण्यांत येईल. सदरचे सेंद्रीय खताचा दर्जा, गुणवत्ता टिकविल्यामुळे सभासद शेतक-यांच्या अधिक पसंतीस कंपोस्ट खतापासून तयार केलेले संजीवनी सेंद्रीय खत उतरले आहे.तेंव्हा उसाबरोबर इतर पिकासाठी या सेंद्रिय खताचा वापर होत असल्याने तीन शिफ्ट मध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खत तयार करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक केले. उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी कारखान्याच्या उपक्रमाची माहिती दिली. उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, केन मॅनेजर जी. बी. शिंदे यांनी सेंद्रीय खत निर्मिती उत्पादनाची माहिती दिली. संचालक बापूसाहेब बारहाते व सौ. संगिता बारहाते यांच्या हस्ते विधीवत पुजन करण्यांत आले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, कारखान्यांचे संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, मनेष गाडे, सतिष आव्हाड, बाळासाहेब पानगव्हाणे, विलास माळी, ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब वक्ते, विलासराव वाबळे, राजेंद्र कोळपे, आप्पासाहेब दवंगे, ज्ञानदेव औताडे, संजय औताडे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, उस उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.