उद्धव ठाकरे शिवसेनेची वंचित आघाडी बरोबर युती; कोपरगावात जल्लोष

उद्धव ठाकरे शिवसेनेची वंचित आघाडी बरोबर युती; कोपरगावात जल्लोष

Uddhav Thackeray’s alliance with Shiv Sena’s Vanchit Aghadi; Jubilation in Kopargaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed25Jan23 , 20.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे निमित्त साधत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची  घोषणा करण्यात आली. या युतीचे  बुधवारी (२५) रोजी कोपरगावात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

शिवसेना वंचित बहुजन आघाडीचा विजय असो,उध्दव साहेब तुम आगे बढो,उध्दव साहेब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है,प्रकाश आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
प्रारंभी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले, शिवसेना वंचित बहुजन आघाडी युतीमुळे खरोखर आनंद होत असुन पुढील आंदोलने व निवडणुका सोबतच लढु.
वंचित  आघाडीचे महाराष्ट्र संघटक शरद खरात म्हणाले की येणा-या काळात लोकशाही टिकली पाहिजे,संविधान टिकले पाहिजे, झोपडीतला माणूस राजा झाला पाहिजे, यासाठी आम्ही एकत्र आलो आहे.
वंचितचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे म्हणाले की, महाराष्ट्रात नविन पर्वाला सुरुवात झाली असे म्हणाले
यावेळी अनिल बनसोडे,संजय कोपरे, सचिन दाभाडे,चंद्रकांत खरात,  कलविंदरसिंग दडियाल,बाळासाहेब जाधव,कुक्कुशेठ सहानी,.दिलीप सोनवणे,किरण खर्डे, इरफान शेख, बाळासाहेब साळुंके,राहुल देशपांडे, विजय जाधव,वर्षा शिंगाडे, अक्षिता आमले, अश्विनी होणे,शीतल चव्हाण, प्रफुल्ल शिंगाडे, विकास शर्मा, शेखर कोलते,सुनील कुंढारे, किरण अडांगळे, योगेश उशीर,वसीम शेख, सतीश खर्डे,विक्रांत झावरे,प्रवीण शेलार, अशोक पवार,संजय बाविस्कर,सुशील बोर्डे, पिंटू पावसे,विशाल झावरे,निलेश पवार, नानासाहेब पगारे,साईनाथ जाधव,अमोल खरात,नारायण पगारे,राजेंद्र पगारे,दत्तात्रय खंडिखोड, सुनिल भालेराव यांच्यासह शिवसैनिक भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page