छत्रपतींच्या शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरणाची आमदारांकडून पाहणी
Chhatrapati’s Shivaji Maharaj Memorial beautification inspection by MLAs
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir27Jan23 , 20.00 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसराला वैभव मिळणार असून हे सौंदर्यीकरणाचे काम उद्यान सुशोभीकरणाच्या १० लाखाच्या निधीतून होत आहे. या कामाला पालिका प्रशासनाने कडून सुरुवात झाली आहे.या सुशोभीकरणाची पाहणी २६ जानेवारी रोजी आमदार आशुतोष काळे यांनी केली. सुशोभीकरणाचे काम १९ फेब्रुवारी शिवजयंतीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
छत्रपती स्मारक सुशोभीकरण कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी तसेच कामामध्ये येणाऱया अडचणी जाणून घेण्यासाठी गुरुवारी २६ जानेवारी रोजी सकाळी आमदार आशुतोष काळे यांनी या सुशोभीकरण कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील गंगुले, मंदार पहाडे , विरेन बोरावके, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद, कृष्णाजी आढाव, डॉ. तुषार गलांडे, सचिन गवारे, शैलेश साबळे, मुकुंद भुतडा, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, वाल्मीक लहिरे, संदीप कपिले, आकाश डागा, अंबादास वडांगळे, राजेंद्र फुलफगर, विजय आढाव, , बापू वढणे, निलेश डांगे, मनोज नरोडे, रंजित जगताप,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मारकाच्या भोवताली रेलिंग, आकर्षक विजेचे खांब, भव्य प्रवेशद्वार, शिवप्रेमी नागरिकांसाठी पूजा करण्यासाठी आसनव्यवस्था, आदी विकासात्मक कामे करून विकसित करण्यात येत आहे.अशी माहिती या कामाचे ठेकेदार इंजिनियर राजेंद्र मुंजे यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिली.
यावेळी मराठा पंच मंदार आढाव यांनी आमदार आशुतोष काळे यांच्याशी चर्चा केली त्यांनी आमदारकाळे यांना सांगितले की या ठिकाणी पुतळ्यालगत जी लोखंडी शिडी उभी करण्यात आली आहे ती काढून टाकावी. त्यामुळे पुतळ्याचे सौंदर्य व भव्यतेला अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर प्रत्येकजण शिडीचा वापर करून शिवरायांच्या गळ्यात पुष्पहार टाकतात. व फोटो सेशन करतात. हे योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या गळ्यात हार घालण्यापेक्षा स्मारकाच्या खाली पुष्प अर्पण करणे योग्य राहील. तसेच ज्यावेळेस शिवजयंती व शिवराज्याभिषेक दिन असेल त्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यासाठी हायड्रोलिक शिडीचा वापर करावा. ठेकेदार मुंजे यांनी सुशोभीकरणाचे थ्रीडी ड्रॉईंग दाखवावे, अशा सूचना केली. यावर आमदार आशुतोष काळे यांनी मंदार आढाव यांना आपण आपल्या सूचनाचे पत्र द्या, त्यावर सर्वांची चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरणाला वेग आला असून काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसात सुशोभीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. मात्र ते काम १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या आत व्हावे, अशा सूचना आमदार काळे यांनी केल्या आहेत.
नगरपालिकेच्या माध्यमातून छ.शिवाजी चौक येथील सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाचे सुशोभीकरण पूर्ण होत असल्याने शिवप्रेमींनी विशेष आनंद व्यक्त केला आहे.