स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण पोलिस स्टेशन व वसाहतीचा प्रश्न मार्गी ; २८.५० कोटीची निविदा प्रसिद्ध
Due to the efforts of Snehalata Kolhe, the issue of rural police station and colony was cleared; 28.50 crores tender published
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir27Jan23 , 20.10 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले असलेल्या कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व पोलीस कर्मचारी वसाहतीसाठी माजी आमदार व भाजपा प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे यासाठी शिंदे फडणवीस सरकारने तब्बल २८ .५० कोटीची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्या बद्दल स्नेहलता कोल्हे यांनी शिंदे फडणवीस सरकारचे आभार व्यक्त केले आहे.
कोपरगाव तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी कोपरगाव शहर व तालुका (ग्रामीण) पोलिस ठाणे असे दोन स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्यात आले.
कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे गेल्या काही वर्षापासून नगरपरिषदेच्या इमारतीत कार्यरत आहे. ही जागा कामकाजाच्या दृष्टीने अपुरी व गैरसोयीची आहे. शहर पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीच्या पश्चिम बाजूस पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची जुनी वसाहत आहे, ती पूर्णपणे मोडकळीस आली आहे.
सदर इमारत दोन खोल्यांची असून, चटई क्षेत्र २०० चौरस फुटांपेक्षाही कमी आहे. पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही जागा राहण्यास अयोग्य व अतिशय अपुरी आहे, याबाबत वृत्तपत्रातूनही समस्या मांडण्यात आली होती.
अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी २०१५ मध्ये नवीन नियोजित आराखड्याप्रमाणे कोपरगाव शहरातील पोलिस विभागाच्या सिटी सर्व्हे नं.१६२५ मध्ये ९७७७.८० चौरस मीटर (१०० गुंठे) १ हेक्टर २१ आरपैकी १ हेक्टर जागेत कोपरगाव शहर व तालुका (ग्रामीण) पोलिस स्टेशन इमारत तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी वसाहत उभारण्याबाबत राज्याच्या पोलिस महासंचालकांना प्रस्ताव दाखल आपल्याच कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाखल केला होता. तू मंजूर करून त्यासाठी निधी मिळावा सातत्याने पाठपुरा सोस्नेहलता कोल्हे यांनी केला होता त्यावर शहर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारत बांधण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ कोटी ३२ लाख रुपये निधी मंजूर केल्याने शहर पोलिस ठाण्याची वैभव शाली इमारत उभी राहिली.
कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे अजूनही जुन्याच जागेत असल्याने सौ. कोल्हे यांनी त्याचा पाठपुरावा करून राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने २९ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या बैठकीत कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे इमारत व पोलिस कर्मचारी वसाहतीत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन ६४ घरे (क्वार्टर्स) सर्व सुविधांसह बांधण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळवली होती, सत्तांतरानंतर महाविकास आघाडी शासनाकडेही तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख व दिलीप वळसे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून या कामासाठी निधीची मागणी केली मात्र तो न मिळाल्याने हे काम रखडले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार ३० जून रोजी सत्तेत आल्यानंतर सौ स्नेहलता कोल्हे यांनी पाठपुरावा सातत्याने सुरू ठेवल्याने या शासनाने प्रशासकीय मान्यतेसह या कामासाठी २८ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर केला, त्यातून ग्रामीण पोलिस ठाणे व पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लागणार आहे, व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त २ बीएचकेचे ५६ फ्लॅट, ३ बीएचकेचे ८ फ्लॅट बांधण्यात येऊन वसाहती अंतर्गत संरक्षक भिंत वाहनतळ रस्ते, गटार, उदवाहन अग्निशमन यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्यामुळे पोलिसांनी समाधान व्यक्त केले.
Post Views:
172