समता पतसंस्थेच्या ‘हर घर क्यु.आर. कोड’ मुळे  महिलांना आर्थिक स्थैर्य – डॉ. वैशाली फुलसुंदर

समता पतसंस्थेच्या ‘हर घर क्यु.आर. कोड’ मुळे  महिलांना आर्थिक स्थैर्य – डॉ. वैशाली फुलसुंदर

Samata Credit Institution’s ‘Har Ghar QR’ Economic stability for women due to Code – Dr. Vaishali Phulsundar

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir27Jan23 , 20.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : महाराष्ट्रात अनेक नवनवीन योजना व उपक्रम राबविणारी पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या  समता पतसंस्थेच्या आता हर घर क्यु.आर. कोड या नव्या योजनेमुळे  महिलांना सुरक्षित बचतीबरोबर आर्थिक स्थैर्य मिळणार असल्याचे गौरव उद्गार डॉ. वैशाली फुलसुंदर यांनी निवारा येथे गुरुवारी हर घर क्यू आर कोड या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी समताच्या व्हाईस चेअरमन श्वेता अजमेरे या होत्या.

यावेळी सौ.दिपा गिरमे, सौ जिजाबाई कापे, सौ.अनिता सरोदे  सौ.शोभा दरक, या मान्यवरांचा सत्कार सौ. ज्योत्स्ना  पटेल, सौ.चित्रा शिरोडे, सौ.मंगल लोणगावकर सौ.सुनिता मुदबखे, सौ.सुनंदा भट्टड यांनी केला 
 निवारा परिसरातील महादेव मंदिर व हनुमान मंदिरासमोरील जागेत शेड साठी देणगी दिल्याबद्दल श्रीकांतलाल जोशी यांचाही सत्कार समता पतसंस्थेचे संचालक  चांगदेव शिरोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून योजनेचे वैशिष्ट्य सांगताना श्रीमती उज्वला बोरावके म्हणाल्या की, प्रत्येक घरातील पतीने पत्नीला घर खर्चासाठी रोख रक्कम दिल्यास ती रक्कम पत्नीकडून पर्स, डबे, देवघरात ठेवली जाते. ती रक्कम हरवणे किंवा चोरीला जाण्याची शक्यता असते. पण समताच्या क्यू.आर.कोडच्या माध्यमातून रोख रक्कम दिल्यास ती रक्कम सुरक्षित राहू शकते आणि त्या रकमेला ७ टक्के व्याजदरही दिला जातो आणि घरात बसून बचत ही करता येऊ शकते.
डॉक्टर वैशाली फुलसुंदर लक्ष्मीनारायण भट्टड, श्रीमती आशा पवार,.किशोर कुलकर्णी यांच्या हस्ते  प्रत्येक सभासदाच्या घरात क्यू. आर कोड देण्यात आले.
 निवारा परिसरातील सौ.मीना व्यास, सौ. सुनंदा भट्टड, सौ.सुनिता मुदबखे, सौ.मंगलाताई बुचके, श्रीमती छाया ओस्तवाल, अजय तांबे यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी  संस्थेचे चेअरमन  काका कोयटे, संचालक अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, कांतीलाल जोशी, गुलशन होडे, बाळासाहेब कापे, हर्षल जोशी आदींसह परिसरातील संस्थेचे सभासद, हितचिंतक , संस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  सुत्रसंचालन ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी केले.उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर  सचिन भट्टड यांनी मानले.
..

कोट – मंदिरातील दानपेटीला क्यू आर कोड सुविधा देण्यापाठोपाठ महिलांसाठी आज हर घर क्यूआर कोड सुविधा प्राप्त करून दिली आहे. कोपरगाव नगरपालिकेने सहकार्य केल्यास घरपट्टी व पाणीपट्टी देखील समताच्या क्यू.आर.कोड च्या माध्यमातून थेट नगरपालिकेच्या खात्यात जमा करता येऊ शकते. असा माझा मानस आहे.- काका कोयटे, चेअरमन,समता पतसंस्था.

Leave a Reply

You cannot copy content of this page