नागरीकांना रस्त्याच्या गुणवत्तेची माहिती द्या- सुनील गंगुले

नागरीकांना रस्त्याच्या गुणवत्तेची माहिती द्या- सुनील गंगुले

Inform citizens about road quality – Sunil Gangule

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir27Jan23 , 20.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल व ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळ नगरी या डांबरी रस्त्याच्या गुणवत्तेबाबत रस्त्यांची स्वत: पाहणी करावी, त्याची योग्य माहीती व लेखी तपशील घेवून आपला स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे केली आहे. 

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी आमदार  आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला होता.निधीतून अनेक रस्त्यांची कामे झाली आहेत. मात्र यापैकी काही
शहरातील डांबरी  रस्त्याचे काम गुणवत्तेनुसार झाले नसल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. रस्त्यांच्या  गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून लोकांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. असे असताना सदर ठेकेदारांना रस्त्याची कामाची बिले अदा करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे
त्या रस्त्याच्या कामाचे देयके संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आली आहेत. याबाबत खात्रीलायक माहिती मिळाली आहे. रस्त्याचे काम दर्जाहीन झालेले असतांना देखील संबंधित ठेकेदाराला त्या निकृष्ट कामाचे देयके अदा करणे यातून शासनाच्या निधीची उधळपट्टी केली जात  आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य कोपरगावकरांना पडला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम खरा की खोटा? हे स्पष्ट करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.
 सदर रस्त्यांच्या कामांसाठी पालिकेने निविदा काढून विविध कंपन्यांना कंत्राट देण्यात आलीत. परंतु त्या कंपन्यांनी प्रत्यक्ष काम न करता उपकंत्राटदार नेमलेत. त्या उपकंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले असून त्यामुळे रस्ते  झाल्यानंतर लगेचच खराब झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराज ते गोकुळनगरी या महत्त्वाच्या व रहदारीच्या रस्त्याला  मुळात निधी कमी देण्यात आला  असल्यामुळे एकाच लेयर काम करण्यात आलेले आहे अशी नागरिकांत चर्चा आहे 
     

Leave a Reply

You cannot copy content of this page