७४ वा प्रजासत्ताक दिन, कोपरगावात उत्साहाचं वातावरण; विविध कार्यक्रमांचं आयोजन
74th Republic Day, atmosphere of excitement in Kopargaon; Organizing various events
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir27Jan23 , 20.40 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त कोपरगावात उत्साहाच्या वातावरणात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते .
दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला.
कोपरगाव तहसील कार्यालय, कोपरगाव नगरपालिका, कोपरगाव पंचायत समिती, शिक्षण मंडळ, कर्मवीर काळे व सहकार महर्षी कोल्हे साखर कारखाने, गोदावरी व संजीवनी दूध संघ कोपरगाव औद्योगिक वसाहत, बँका, पतसंस्था शैक्षणिक संस्था, शाळा, विद्यालयं, सोमय्या रोहमारे महाविद्यालय सद्गुरु गंगागीर महाराज महाविद्यालय संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज महिला कॉलेज सरकारी कार्यालयं, शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, सहाय्यक निबंधक कार्यालय, कोपरगाव न्यायालय या सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
रयत संकुलात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना एकता, अखंडता आणि एकात्मता अबाधित ठेवा आव्हान आ.आशुतोष काळे यांनी केले
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे, कोपरगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील सार्वजनिक ध्वजारोहण भारतीय जनता पक्ष, शेतकरी सहकारी संघ येथील ध्वजारोहण संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते तर संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल येथील झेंडावंदन कोल्हे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांच्या हस्ते झाले.
चौकट
प्रजासत्ताक दिनी होणारे तीन आंदोलन स्थगित
किसन ठकाजी पवार रा.हिंगणी ता.कोपरगाव हे घरकुल योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी तहसिल कार्यालय,कोपरगाव समोर आमरण उपोषण बसलेले होते त्यांना गटविकास अधिकारी श्री सुर्यवंशी यांनी त्यांच्या मागण्या पुर्ण करणे बाबत लेखी आश्वासन दिल्याने उपोषण सोडले आहे.
श्री रुपेश देविदास थोरात रा.कोपरगाव हे अहमदनगर ते मालेगाव हायवे रोडची दुरस्ती करणेकामी तहसिल कार्यालय,कोपरगाव समोर उपोषणास बसलेले होते.त्याअनुषंगाने नायब तहसिलदार, श्रीमती मनिषा कुलकर्णी यांनी आश्वाशीत केल्याने उपोषण सोडले आहे.
मनसे चे संतोष गंगवाल.अनिल गायकवाड . सुनील फंड यांनी पालिका जलतरण तलाव सुरू करावा यासाठी आत्मदहन लेखी इशारा दिला होता . ते नगरपालिकेने मान्य केल्याने मनसेने आत्मदहन इशारा मागे घेतला आहे. या तिन्ही आंदोलनात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांची मध्यस्थी म्हणून महत्त्वाची भूमिका ठरली