कोपरगाव नगर सायकलवारी; गुलाब पुष्प वाहणार जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी- संजय काळे

कोपरगाव नगर सायकलवारी; गुलाब पुष्प वाहणार जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी- संजय काळे

Kopargaon Nagar Cycle Walk; Roses will flow to the door of the Collector – Sanjay Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir27Jan23 , 20.50 Pm
By राजेंद्र सालकर

श्री साई समाधिवरील फुले बंदीचा शेतकऱ्यांना एक हजार कोटीचा फटका ;  शेतकरी विक्रेते  व भक्तांचे  हाल

कोपरगाव : श्री साई समाधिवरील फुले बंदचा फटका ; फुलं शेती शेतकऱ्यांना व विक्रेत्यांना हार फुले माळा विणणाऱ्या मजुरांना बसत असून भक्तांचे हाल होत आहे तेंव्हा श्री साई समाधी वर फुले वाहण्याचा  बंद करण्याचा निर्णय मागे घेऊन समाधीवर हार फुलं पूर्ववत  अर्पण करणे सुरू करावी  अन्यथा कोपरगाव ते अहमदनगर सायकल वारी, गुलाब पुष्प वाहणार आपल्या दारी असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या पत्रातून दिलेला आहे.

श्री साईबाबा संस्थाने समाधीवर हार फुले वाहण्यास बंदी घातली यावर बोलताना संजय काळे म्हणाले, मार्च २०२० मध्ये झालेल्या कोरोना प्रकोप त्यानंतर हार फुलांच्या विक्रीमुळे गुन्हेगारीत वाढ होते तसेच साई भक्तांची लूट होत असल्याच्या कारणास्तव ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर श्री. साईबाबा संस्थानने साई समाधीवर हार फुले  वाहण्यासाठी साठी बंदी घातली. असल्याचे संजय काळे यांनी सांगितले आहे. 
कोरोना महामारी गेली, सर्व निर्बंध उठले परंतु आज अखेर शिर्डीत हार फुले विक्री चालू झालेली नाही.त्यामुळे श्री साई समाधिवरील फुले बंदीचा वार्षिक एक हजार कोटीचा  फटका ; कोपरगाव, राहाता, संगमनेर, राहूरी, श्रीरामपूर या सर्व तालुक्यातील फुलं शेती करणा-या हजारो शेतकऱ्यांना, शेकडो हार, फुलं, व प्रसाद विक्रेत्यांना व हार फुले माळा विणणाऱ्या मजुरांना बसत असून साई चरणी पूजा करणाऱ्या   लाखो भक्तांचे फुलां अभावी हाल होत आहे. तेव्हा तातडीने  समाधीवर हार फुल वाहण्याची  प्रथा सुरू करावी  
  याबाबत संजय काळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मला उपनिबंधक सहकारी संस्था यांचे अहवालाप्रमाणे एकट्या राहाता तालुक्यात ३१७ शेतकरी गुलाब शेती करतात त्यांचे सरासरी गुलाब शेतीचे वार्षिक उत्पन्न १३८ कोटींची आहे. तसेच शिर्डीच्या फुलंबाजारात संगमनेर, श्रीरामपूर, राहूरी, कोपरगाव तालुक्यांमधून देखील गुलाब फुलं येतात. या तालुक्यांचा विचार करता गुलाब शेतीवर सुमारे पाचशे कोटी वार्षिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. जर गुलछडी, झेंडू, सब्जा, शेवंती, तुलसी इत्यादी चा एकूण बाजार धरला तर  उपनिबंधक सहकारी संस्था याचे अहवालाप्रमाणे शिर्डी बाजारपेठेन केवळ फुलं शेतीतून येणाऱ्या जवळ जवळ एक हजार कोटी रुपयांच्या उत्पन्नापासून शेतकरी वंचित राहत आहे त्याचबरोबर या साखळीत व्यापारी विक्रेते यांचेही मोठे नुकसान होत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांची एवढे मोठे नुकसान होत आहे तेव्हा त्यांनी यात लक्ष  खालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असेही  काळे यांनी पत्रात नमूद केले आहे. 
तेंव्हा  श्री साई समाधी मंदिर व्यवस्थापन समिती  व स्थानिक ग्रामस्यांनी फुलांवरील बंदी मागे घेऊन शेतकरी, विक्रेते यांची आर्थिक बाजूचा  तर भक्तांच्या भावनांचा विचार करून लवकरात लवकर निर्णय मागे घ्यावा  
व श्री साई समाधीवर हार फुलं चालू करावी  अन्यया २० फेब्रुवारी  रोजी मी कोपरगान ने अहमदनगर सायकलवर गुलाबाची फुले घेऊन येऊन आपले दालनाचे दारासमोर अर्पण करणार अ असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना पाठविलेल्या पत्रातून दिलेला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page