परीक्षा पे चर्चा’ विद्यार्थ्यांचे जीवन बदलून टाकणारी – सौ. स्नेहलता कोल्हे

परीक्षा पे चर्चा’ विद्यार्थ्यांचे जीवन बदलून टाकणारी – सौ. स्नेहलता कोल्हे

Exam Pe Charcha’ Changing Lives of Students – Ms. Snehalata Kolhe

९ हजार विद्यार्थ्यांनी पाहिला लाईव्ह कार्यक्रम 9 thousand students watched the live program

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat28Jan23 , 19.10 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : भाजपचे प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे  यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘परीक्षा पे चर्चा’ लाईव्ह यावर बोलताना म्हणाल्या. यांनी सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास’ या त्रिसूत्रीचा अवलंब करणारे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी  सन २०१८ पासून ‘परीक्षेवर चर्चा’ (परीक्षा पे चर्चा) हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. पंतप्रधानांनी सांगितलेल्या गोष्टी हा केवळ परीक्षेतच नव्हे तर आयुष्यातही यशाचा मंत्र आहे.   केवळ परीक्षेसाठीच नाही तर दैनंदिन जीवनातही वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, फक्त आपल्या कामाला प्राधान्य द्या,  ही चर्चा विद्यार्थ्यांचे जीवन बदलून टाकणारी आहे, असे सौ कोल्हे म्हणाल्या,

कोपरगाव तालुक्यात भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सोमय्या कॉलेज, सद्गुरु गंगागीर महाराज कॉलेज यासह ६० विद्यालयातील सुमारे  नऊ हजार विद्यार्थ्यांनी पाहिला नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रम पाहिला.
परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी व कोणत्याही समस्येला घाबरू नये. तणावमुक्त राहून परीक्षेला सामोरे जावे, असा सल्ला दिला.पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मुलांना वेळेच्या नियोजनाविषयी काही कानमंत्र दिले आणि नियोजनाचे महत्व सांगून महत्त्वाच्या सूचना दिल्या. 
              
             यावेळी सद्गुरु गंगागीर महाराज कॉलेजचे.  प्राचार्य डॉ रमेश सानप, के.जे. एस. कॉलेजचे प्राचार्य डॉ बी. एस. यादव, उपप्राचार्य डी. एस. सोनवणे, संतोष पगारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे,माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर, विजयराव आढाव,जगदीश मोरे, आदी उपस्थित होते

Leave a Reply

You cannot copy content of this page