अभ्यासाव्यतिरिक्त ही इतर पुस्तके वाचा ; गुणगौरव समारंभात नाईकांचा विद्यार्थ्यांना सल्ला

अभ्यासाव्यतिरिक्त ही इतर पुस्तके वाचा ; गुणगौरव समारंभात नाईकांचा विद्यार्थ्यांना सल्ला

Apart from studying read these other books; Naik’s advice to students at the merit ceremony

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat28Jan23 , 19.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  केड्राई अध्यक्ष  प्रसाद नाईक यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या युगात पुस्तक वाचनाचा विसर पडला आहे. पुस्तक वाचन आयुष्यात महत्त्वाचे असल्यानेअभ्यासाव्यतिरिक्त ही इतर पुस्तकांचे वाचन केले पाहिजे, असे आवाहन केले.अध्यक्षस्थानी प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी होते.

कोपरगाव नगरपरिषद संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि कोपरगाव नगरपरिषद यांच्या वतीने २६ जानेवारी निमित्त वाचनालयाच्या सभागृहात आयोजित गुणगौरव समारंभात ते बोलत होते. 
यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक  
कोपरगाव केड्राई अध्यक्ष प्रसाद नाईक रोटरी क्लब अध्यक्ष वीरेन अग्रवाल, रोटरी सचिव राकेश काले,कर निरीक्षक श्वेता शिंदे,  कर अधिकारी पल्लवी सूर्यवंशी उपस्थित होते.
यावेळी विरेन अग्रवाल म्हणाले की, 
कोपरगाव नगर परिषदेच्या सुसज्ज अशा वाचनालयाचा सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे. पालिकेने विद्यार्थ्यांना वाचनालय मोफत केले पाहिजे अशी अपेक्षा राकेश काले यांनी व्यक्त केली.
अध्यक्षपदावरून  बोलतांना मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी गुणगौरव सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द तयार होते, त्यांची स्पर्धक वृत्ती वाढीस लागते आणि यातूनच भविष्यात चांगले  प्रशासक आणि कर्तव्य दक्ष अधिकारी तयार होऊ शकतात असे मार्गदर्शन केले.
यावेळी जंम्प रोप स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झालेल्या दोन विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
प्रास्ताविक रवींद्र वाल्हेकर यांनी केले तर सूत्रसंचालन भावना गवांदे यांनी केले.आभार रामनाथ जाधव यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे शेलार थोरात व राक्षेताई यांनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी अधिकारी तसेच गुणगौरव स्वीकारण्यासाठी विध्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page