समता स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन- गोविंद शिंदे 

समता स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन- गोविंद शिंदे

A vision of Maharashtra culture through the art of students of Samata School – Govind Shinde

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat28Jan23 , 19.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  समता इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून  भारत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले असल्याचे गौरवउद्गार प्रांत अधिकारी  गोविंद शिंदे यांनी समता स्कूलच्या   ‘उडान २०२२’ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी व्यक्त केले. 

पारितोषिक वितरण प्रसंगी शिर्डी विमानतळाचे डेप्युटी कमांडर अमिशकुमार ,सौ. संजीवनी  शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

उपप्राचार्य समीर आत्तार प्रास्ताविकातून ब्रिटिश कौन्सिल कडून शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा पुरस्कार, खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरीसोबत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कृती कार्यक्रमाचे आयोजन, रंगोत्सव स्पर्धा तसेच आर्ट वोल्कॅनोत मुलांचे यश यांसह उच्च दर्जाच्या शिक्षणामुळे शैक्षणिक दृष्ट्याही अहमदनगर जिल्ह्यात समता स्कूल नावाजलेले आहे. 
यावेळी  स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे म्हणाल्या की ,या वर्षी ‘ उडान ‘ (आजादी से बुलंदी तक) संकल्पनेच्या आधारे भारत स्वतंत्र होण्यासाठी जे देशभक्त, समाज सुधारक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४७ पासून भारत देशाने सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतांना आज समताच्या मॅनेजमेंटने सेमी ऑलिंपिक साईजचा स्विमिंग पूल उभारला असल्याची माहिती दिली. 
स्नेहसंमेलनात भारतीय संविधान, हरितक्रांती, श्वेतक्रांती, शैक्षणिक विकास , औद्योगिक विकास, भारतीय संरक्षण दल, मनोरंजन, क्रीडा, भारतीय अवकाश, संशोधन संस्था, तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत देशाचे जगातील प्रभावशाली स्थान व महत्त्व विशद करत देशभक्तीपर, सामाजिक, सांस्कृतिक मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील विविध गीतांवर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच २०२२ – २३ या वर्षात सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, पातळीवर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह आणि बक्षिसे देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरणाचे सुत्रसंचालन शिर्डी येथील समता टायनी टॉट्सच्या प्राचार्य सौ.माही तोलानी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीते साठी मुख्य कार्यवाहक संदिप कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी समता इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक काका कोयटे, समता पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन सौ श्वेता अजमेरे, अरविंद पटेल, .गुलाबचंद अग्रवाल,.चांगदेव शिरोडे, कांतीलाल जोशी, .गुलशन होडे, सौ.सिमरन खुबानी, .हर्षल जोशी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आदींसह विद्यार्थ्यांचा पालक वर्ग, हितचिंतक परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थितांचे आभार आदिती रावलिया हिने मानले.

कोट – मुलांचा सर्वांगीण विकास हा आमचा मुख्य उद्देश आहे. तुमची मुलं, ती आमची मुलं या प्रमाणे एका पाल्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर संस्कार करत असतो-सौ.स्वाती  कोयटे ,

.

Leave a Reply

You cannot copy content of this page