कोपरगाव जलतरण तलावाची वापराविनाच दुरावस्था; पालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह

कोपरगाव जलतरण तलावाची वापराविनाच दुरावस्था; पालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह

Kopargaon swimming pool in disrepair without use; A question mark on the governance of the municipality itself

इंडोर गेम हॉल जलतरण तलावाचा बट्टाबोळ गवत-झुडपांमध्ये हरवला जलतरण तलाव,  खर्ची घालण्यात आलेला पावणेदोन कोटीचा निधी वाया,Indoor game hall swimming pool lost in grass and bushes Swimming pool, wasted funds of Rs.1.75

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sum29Jan23 , 19.30 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव: कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने  सन २००९-१० साली वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सर्वे नंबर १६२१, १७६७ मध्ये अंदाजे पावणे दोन कोटी रुपये निधीच्या जलतरण तलावांची उभारणी केली आहे. मात्र  जलतरण तलाव वापरापासून वंचित आहे. मात्र जलतरण तलाव पूर्ण होऊन  १२ वर्षे (एक तप) उलटली तरी अद्याप वापरासाठी खुले करण्यात आले नाही. परिणामी या ठिकाणी असलेल्या जलतरण तलावाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. प्रशस्त जागेत निर्माण करण्यात आलेल्या जलतरण तलावाच्या सभोवती गवत आणि झाडे झुडपे वाढली आहेत. तसेच चेंजिंग रूमच्या परिसरात झुडपे वाढल्याने इमारतीला अवकळा प्राप्त झाली आहे. संपूर्ण परिसर  झाडा झुडपांच्या विळख्यात सापडले आहे. कोटीचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या जलतरण तलावाची दुरवस्था झाली आहे.

  गजानन नगर व महादेव नगर  यांच्यामधील पट्ट्यात  असलेल्या इंडोर गेम हॉल परिसरात असलेल्या खुल्या जागेत  जलतरण तलाव  निर्माण करण्यात आला आहे. मात्र कधीच सुरु न झालेल्या या  तलावातील टाईल्स तुटलेल्या असून केरकचरा व धुळ साचलेली आहे. चेंजींग रुम व शॉवरचीही तशीच अवस्था आहे. सभोवताली झाडीझुडपी व केरकचरा दिसून येतो. जलतरण तलावाला गवत आणि झाडा झुडपांनी वेढले आहे. सदर जलतरण  खुले करण्याकडे नगरपालिका  प्रशासनाचे दुर्लक्ष व निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा हल्लाबोल शुक्रवारी मनसेकडून करण्यात आला होता.
  
कोपरगाव येथील इंदोर गेम हॉल  भागात उभारण्यात आलेल्या तरण तलावाचे बारा वर्षांपुर्वी  मोठा गाजावाजा करत उद्घाटन करण्यात आले.  मात्र, आज पर्यंत बंदावस्थेत असलेल्या या तरण तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाने कानाडोळा केल्याने व वापर झालेला नसल्यामुळे येथील जलशुद्धीकरण यंत्रणा नादुरुस्त  झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे १२  वर्षांपुर्वी उभारण्यात आलेल्या तरण तलावाची वापराविनाच दुरावस्था झाल्याचे चित्र असून यामुळे पालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोपरगाव नगरपालिका क्षेत्रात उत्तम जलतरणपटू तयार व्हावेत यासाठी पालिकेकडून शहराच्या या भागात तरण तलावांची उभारणी करण्यात आली  आहे. मात्र त्यांना आजतागायत तलावाचा लाभ घेता आलेला नाही.
अशाचप्रकारे १२ वर्षांपुर्वी तरण तलाव बांधण्यात आला असून   वापराविनाच तरण तलाव नादुरुस्त झाल्याच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर आता टिका होऊ लागली आहे.

वास्तू धूळखात

 तरण तलाव करण्यात आला. परंतु पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील नागरिकांना त्याचा लाभ घेता आलेला नाही. त्यानंतर ही वास्तू धूळखात पडली असल्याचे  दिसून येते. त्यामुळे ही वास्तूं  नागरिकांसाठी खुली करावी. जेणेकरून सर्वसामान्यांना त्याचा वापर करता येईल.- संतोष गंगवाल जिल्हा उपाध्यक्ष, मनसे
तरण तलावाची दुर्दशा झाली असतानाही प्रशासनाने डोळ्यांवर झापडे का लावली आहेत.? तरण तलावाच्या दुरुस्ती का होत नाही ,  जलतरण तलावची नेमकी काय स्थिती आहे ? याची चौकशी  मुख्याधिकारी यांनी करून  सत्य जनतेसमोर आणले पाहिजे.  तसेच मुख्याधिकारी यांनी तातडीने यात लक्ष घालून दुरुस्ती करून  येत्या उन्हाळ्याच्या आत जलतरण तलाव सुरू करावा.
चौकट
शहरातील भव्य जलतरण तलाव नागरिकांसाठी २५ जानेवारी पर्यंत खुला करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.  खुला न झाल्यास आत्मदहन  करू असा इशारा येथील मनसे कार्यकर्त्यांकडून  पालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला होता. तरीही पालिकेची  उदासीनता दिसून आली. प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागू नये म्हणून शहर पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मध्यस्थीनंतर तूर्तास आत्मदहनाचा निर्णय मनसेने स्थगित केला आहे.
मात्र प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर  स्थिती जैसे थे असून मनसेच्या कार्यकर्त्यांचे  समाधान करण्यासाठी  नगरपालिकेने जेसीबी लावून थातूर मातूर काटे काढण्याचे काम करून आंदोलकांची  बोळवण केली आहे. आता तरी पालिकेने या कामी लक्ष घालून तातडीने या तलावाची दुरुस्ती करावी एवढीच अपेक्षा कोपरगावकरांकडून आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page