नाशिक पदवीधरसाठी कोपरगावात  ४०.४१ टक्के मतदान; शांततेत

नाशिक पदवीधरसाठी कोपरगावात  ४०.४१ टक्के मतदान; शांततेत

40.41 percent turnout in Kopargaon for Nashik graduates; in silence

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon30Jan23 , 20.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव:  पहिल्या दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी कोपरगावात ४०.४१  टक्के मतदान; शांततेत पार पडले.एकूण ८४६४ मतदारांपैकी केवळ ३४२०  मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात २५५४ पुरुष तर ८६६ महिलांचा समावेश असल्याची   माहिती निवडणूक  निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली.

 नाशिक पदवीधर मतदान प्रक्रियेला कोपरगावात शहर व तालुक्यातील आठ मतदार केंद्रावर  सकाळी आठपासून मतदानाला सुरुवात झाली. आठ ते दहा या ५.६% पहिल्या दोन तासात बारा वाजेपर्यंत मतदार केंद्रावर   १५.२६ % मतदान झाले होते. बारा ते दोन या कालावधीत २६.३० % मतदान झाले तर   दोन ते चार या शेवटच्या टप्प्यात ४०.४१ % मतदान झाले. एकंदर पदवीधर मतदारसंघात मतदारांची उदासीनता दिसून आली. 
कोपरगाव शहरातील जुने सायन्स कॉलेज नगरपालिका शाळेत बुथ क्रमांक ( २४५)  एकूण मतदान १०८७, झालेले मतदान ५३२ (४८.९४टक्के), बुथ क्रमांक ( २४६)  एकुण मतदान १०५७ झालेले मतदान ५२६(४९.७६ टक्के),बुथ क्रमांक ( २४७)  एकुण मतदान १११४, झालेले मतदान ४७७ (४२.८२टक्के)
बुथ क्रमांक ( २४८)  एकुण मतदान १२१४ झालेले मतदान ४४७ (३६.८२टक्के)असे चार बूथ मिळून एकूण मतदान ४४७२ झालेले मतदान १९८२ ( ४२ टक्के),
तर पोहेगाव बूथ क्रमांक (२४९) एकूण मतदान ११०३, झालेले मतदान ३९० (३५.३६ टक्के), रवंदे बूथ क्रमांक (२५०) ९२५ मतदान झालेले मतदान ३४३ (३७.०८टक्के) सुरेगाव  बूथ क्रमांक (२५१) १३६३ मतदान, झालेले मतदान ५०१(३६.७६ टक्के) दहिगाव बोलका बूथ क्रमांक (२५२) ६०१ मतदान झालेले मतदान २०४ (३३.९४ टक्के) ग्रामीण भागातील  चार बूथ मिळून एकूण मतदान ३९९२ झालेले मतदान १४३८ ( ३६ टक्के)
शहरातील जुने सायन्स नगरपालिका शाळेतील मतदान केंद्रावर
मुख्याधिकारी शांताराम गोसावी बुथ (२४५),गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी बुथ नं. (२४६)  गटविकास अधिकारी ज्ञानदेव लाटे बुथ नं.   (२४७),गट विकास अधिकारी मनोज घोडेराव बुथ नं. (२४८) यांनी काम पाहिले. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी कोपरगाव शहर  पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसलेव तालुका  पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव च्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पदवीधर मतदार संघासाठी कोल्हे व काळे कुटुंबीयांनी  मतदानाचा हक्क बजावला
नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या घडामोडींमुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेत राहिली असली तरी मतदारांचा मात्र  निरुत्साह दिसून आला आहे. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले  आहे. 

चौकट

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शुभांगी पाटील यांनी कोपरगाव शहरातील जुने सायन्स कॉलेज मतदान केंद्राला भेट दिली त्यावेळेस मतदान केंद्राबाहेर उभे असलेले विवेक कोल्हे यांना म्हणाल्या दादा बहीण म्हणून आम्हाला पाठिंबा द्या  असा संवाद केला असता विवेक कोल्हे यांनी त्यांना ताई आपल्याला थोडा उशीर झाला  मी आत्ताच मतदान करून आलो आहे. आता नाही तर शिक्षक मतदार संघ पुन्हा आहेच ? त्यावर त्या म्हणाल्या सांगा आता तरी जे पुढचे राहिले आहेत त्यावर  आमच्या सांगण्यातल्या सर्वांनी मतदान केले आहे तुमचे जे अपेक्षित आहे ते काही मला या ठिकाणी दिसत नाही  असे विवेक  कोल्हे  म्हणाले त्यावर तुम्ही शब्द तर टाकून पहा नाही ऐकले तर ठीकच आहे  असे प्रत्युत्तर उमेदवार शुभांगी पाटील यांनी दिले या शाब्दिक जुगलबंदीवर उपस्थितामध्ये मोठा हशा पिकला….  

 

 

Leave a Reply

You cannot copy content of this page