कोपरगाव तालुका पोलिसांनी १० जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारी महिंद्रा पिकअप पकडली
Kopargaon taluka police caught a Mahindra pickup carrying 10 animals for slaughter
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon30Jan23 , 20.40 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव :राज्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना कत्तलीसाठी जनावरे वाहतूक सुरूच आहे. नुकतीच नगर-मनमाड महामार्गावर येसगाव शिवारातील भास्कर वस्ती समोर सोमवारी सकाळी ९.५० वाजण्याच्या सुमारास कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तिला कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने पाठलाग करून पकडले.
याप्रकरणी शरद साहेबराव मढवई (४०) राहणार चिचोंडी तालुका येवला जिल्हा नाशिक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी क्रमांक MH-20 EG-8155 जनावरे भरून कत्तलीसाठी जाणाऱ्या एकाला कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने पाठलाग करत पकडले आहे.
पिकअप गाडीत व गायी, गो-हे व कालवड अशी १० जनावरे असा एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आंधळे अधिक तपास करीत आहेत.
पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश सुरेश नवाळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरद साहेबराव मढवई याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर-६४/२०२३ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनियम १९९५ चे सुधारित कलम ५ (अ) सह ९ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम ३ व ११ प्रमाणे.गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे १० जनावरांना जीवदान मिळाले आहे.