योजना आपल्या दारी’ च्या मदतीने वंचितांना लाभ मिळेल – आ. आशुतोष काळे

योजना आपल्या दारी’ च्या मदतीने वंचितांना लाभ मिळेल – आ. आशुतोष काळे

The underprivileged will benefit with the help of Yojana Apa Dari’ – Aa. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 4Feb23 , 19.10 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यापर्यंत  पोहचविण्यासाठी  शासकीय योजना आपल्या दारी या उपक्रमास मिळालेला वाढता प्रतिसाद बघितल्यानंतर हा उपक्रम लाभार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार  असल्याचा आत्मविश्वास आमदार आशुतोष काळे यांनी शनिवारी सुभाष नगर येथे व्यक्त केला.

आ. काळे म्हणाले की, योग्य मार्गदर्शनाअभावी  अनेक पात्र लाभार्थी सरकारी योजना पासून वंचित राहतात  ते वंचित राहू नाही यासाठी सरकारने शासकीय योजना आपल्या दारी  हा उपक्रम सुरू केला असल्यामुळे  लाभार्थ्यांना या उपक्रमातून कागदपत्रांची माहिती व योग्य मार्गदर्शन  मिळेल व त्यामुळे त्यांना  सुलभपणे योजनांचा लाभ मिळवता येईल  हे सांगताना प्रत्येक प्रभागात हा उपक्रम राबविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला  . 
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,  सुधाकर रोहोम,   मंदार पहाडे, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे,  नवाज कुरेशी, प्रकाश दुशिंग, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, इम्तियाज अत्तार, रहेमान कुरेशी, एकनाथ गंगूले, अक्षय आंग्रे, बाळासाहेब सोनटक्के, राजेंद्र आभाळे, सोहिल कुरेशी, वाजीद कुरेशी, ऋषीकेश धुमाळ, सचिन शिंदे, राजेंद्र मरसाळे, नदीम कुरेशी, शेखर डहानके, निलेश शिंदे, अझर खाटीक, किशोर चव्हाण, बंटी चावरे, प्रविण चौधरी आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page