मुंबई शिर्डी ‘वंदे भारत एक्सप्रेसला’ ला कोपरगावात थांबा द्या, आमदार काळेंची मागणी
Stop Mumbai Shirdi ‘Vande Bharat Express’ at Kopargaon, demand MLA Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 4Feb23 , 19.20 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : येथील रेल्वेस्थानकावर असंख्य नागरिक नेहमीच कामानिमित्त मुंबई येथे जात असतात. मात्र, कोपरगाव रेल्वेस्थानकावर मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला थांबा दिला नसल्याने या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला कोपरगाव स्थानकात थांबा द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस १० फेब्रुवारीपासून सुरु होणार असून या या एक्स्प्रेसला मनमाड,नाशिक, ठाणे या ठिकाणी अधिकृत थांबा आहे.
गेल्या काही वर्षात वाढलेले नागरिकरण, दैनंदिन प्रवास करणारे विद्यार्थी व नोकरदार तसेच विकसीत होत असलेले स्थानक यामुळे कोपरगाव परिसरातील रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात वाढत आहे. शेती, व्यवसाय व इतर कामाच्या निमित्ताने अनेक नागरिक नियमित प्रवास करीत आहेत. मात्र, कोपरगाव स्थानकात मुंबईला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला थांबा नसल्याने येथील नागरिकांना मुंबईकडे जाण्यासाठी शिर्डी किंवा मनमाड स्थानकावर जावे लागेल.
या मार्गावरून मुंबईला जाणाऱ्या या नागरिकांसाठी कोपरगाव येथून आठवड्यातून केवळ एकच एक्स्प्रेस असून रात्रीचा गाडीला थांबा दिलेला आहे. मात्र, रात्रीच्या गाडीला एकही प्रवासी येथे दिसत नाही. कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना मुबईला जायचे असल्यास एसटी बसने मनमाडला जाऊन मुंबई गाडी पकडावी लागते.यामध्ये वेळ व पैशाचा अपव्यय होऊन मोठा त्रासही सहन करावा लागत असल्याची तक्रार करीत कोपरगाव करीत आहेत. मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेस ला गाडीला थांबा देण्याची मागणी केली आहे.जलद प्रवास असल्याने कोपरगावकरांची पसंत मुंबईसाठी वंदेभारत एक्सप्रेसला राहणार आहे. त्यामुळे कोपरगाव रेल्वे स्थानकाचे आर्थिक उत्पन्न देखील वाढण्यास मदत होणार असल्याचे आमदार काळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
चौकट
वीजदरवाढी संदर्भात हरकती नोंदविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत सोमवारी( ६) रोजी सायंकाळी ५.०० वाजता त्यांच्या कोपरगाव जनसंपर्क कार्यालयात बैठक होणार आहे .
Post Views:
188