राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धा : आमदार काळेंच्या हस्ते भव्य उद्घाटन
National Jump Rope Competition: Grand Inauguration by MLA Kalen
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 4Feb23 , 19.30 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते समता इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेचे शनिवारी भव्य उद्घाटन करण्यात आले. समता हे महाराष्ट्रातील विद्यार्थी केंद्रित स्कूल आहे या राष्ट्रीय स्पर्धेतुन खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करतील, असा विश्वास या उद्घाटन सोहळय़ादरम्यान आमदार काळेंनी व्यक्त केला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन आमदार आशुतोष काळे व सिंदखेडचे लखोजीराजे जाधव यांचे १६ वंशज शिवाजीराजे जाधव यांनी केले. राष्ट्रीय पातळीवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणे ही त्या स्पर्धकासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. असे ते यावेळी म्हणाले,
या सोहळ्यात समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारतातील विविधतेतील एकतेचे दर्शन घडविणारे नृत्य सादर केले.
समता इंटरनॅशनल स्कूल येथील क्रीडा मैदानावर झालेल्या या भव्य सोहळय़ात राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे, माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, नायब तहसिलदार संजय ईसाळकर, भारतीय जम्प रोप महासंघ सचिव शाजाद खान, महाराष्ट्र जम्प रोप सचिव दिपक निकम,ॲड. जयंत जोशी, नाशिक टी.डी.एफ. जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, शिव छञपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, दिलीप घोडके, समता मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे,
उपस्थित होते.
प्रास्ताविकात जम्प रोप जिल्हाअध्यक्ष संदीप कोयटे महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश, आसाम, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात आदींसह १६ राज्यातील ४५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असुन परीक्षक म्हणून धर्मेश परमार (गुजरात), राजेंद्र प्रसाद (तेलंगणा), आरिफ खान (राजस्थान), मुकुंद झोला (मध्य प्रदेश), उत्पल बोरा (आसाम), गोपेश चांदणी (छत्तीसगड), पवन सिंग व डॉक्टर सीमा पवनगोत्रा (जम्मू काश्मीर) म्हणून काम पाहणार असल्याची माहिती दिली.
शाजाद खान, ॲड. जयंत जोशी, अशोक दुधारे यांनी मनोगतातून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
पाहुण्यांचे स्वागत सुत्रसंचालन आणि आभार उपप्राचार्य समीर अत्तार यांनी मानले.
Post Views:
138