विजेचा प्रश्न मार्गी लागला शेतकरी व वीज ग्राहकांकडून  स्नेहलता कोल्हे यांचे आभार

विजेचा प्रश्न मार्गी लागला शेतकरी व वीज ग्राहकांकडून  स्नेहलता कोल्हे यांचे आभार

Thanks to Snehalata Kolhe from the farmers and electricity consumers

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 4Feb23 , 19.40 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : तालुक्यातील  विद्युत उपकेंद्रावर विजेचा अतिभारामुळे पोहेगाव, सुरेगाव, चासनळी, कारवाडी, मंजूर, हंडेवाडी आदी भागातील घरगुती वीज ग्राहकांना आणि कृषिपंपांना सुरळीत वीजपुरवठा करण्यात सतत अडचणी येत होत्या, तो प्रश्न भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्यातून सुटल्यामुळे शेतकरी व नागरिकांनी त्यांचे आभार मानले. 

                 तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शहा वीज उपकेंद्राचा पाठपुरावा केला. याकामी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी शहा (ता. सिन्नर) येथे १३२ के.व्ही. विद्युत उपकेंद्रासाठी जवळपास १६ एकर जागा उपलब्ध करून दिल्याने, हे उपकेंद्र नुकतेच कार्यान्वितदेखील झाले आहे. त्यामुळे पोहेगाव, सुरेगाव, चासनळी विद्युत उपकेंद्र जोडून  कारवाडी, मंजूर, हंडेवाडीसह पोहेगाव, सुरेगाव, चासनळी आदी अनेक गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे.  

Leave a Reply

You cannot copy content of this page