प्रस्तावित वीज दरवाढ विरोधात हरकती, तक्रारी नोंदवा -आ. आशुतोष काळे 

प्रस्तावित वीज दरवाढ विरोधात हरकती, तक्रारी नोंदवा -आ. आशुतोष काळे 

Register objections, complaints against the proposed electricity tariff hike -A. Ashutosh Kale

वीज कंपनी टप्प्याटप्प्याने खाजगीकरण करण्याचा डावPlan to privatize power company in phases

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 6 Feb23 , 20.40 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : महावितरणने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे जवळपास ३७ % इतकी प्रचंड वीज दरवाढ  करण्यासाठी परवानगी मागितली आहे. मुळातच महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत वीजदर अधिक आहे. पुन्हा दरवाढ लादल्यास महाराष्ट्रातील घरगुती, व्यापारी, औद्योगिक व शेतकरी या सर्वांचे  आर्थिक गणित कोलमडणार आहे. त्यामुळे प्रस्तावित वीज दरवाढ विरोधात १५ फेब्रुवारीच्या आत हरकती, तक्रारी ऑनलाइन – ऑफलाईन नोंदवा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारी झालेल्या जनता दरबारात केले 

यावेळी पद्माकांत कुदळे , डॉ.अजय गर्जे, सुनिल गंगुले,धरमशेठ बागरेचा, डॉ.तुषार गलांडे, काळे कारखाना उपाध्यक्ष दिलीप बोरनारे, मंदार पहाडे, विरेन बोरावके,सुनील शिलेदार, अड.मनोज कडू, शैलेश साबळे, आकाश डागा,बाळासाहेब रूईकर, आधीच विविध गावातील शेतकरी पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
काळे पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील वीजदर कळीचा मुद्दा ठरत आहे. याबाबत आपण अजितदादांची बोलणार असल्याचे सांगत सातत्याने होणाऱ्या दरवाढी मागे वीज कंपनीचे टप्प्पाने खाजगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.  जीवनावश्यक वस्तूच्या दर वाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे शेतीमध्ये उत्पादन खर्च सातत्याने वाढत  आहे. शेतीमालाला मात्र त्या प्रमाणात भाव मिळत नाही सातत्याने तेच तेच प्रश्न  समोर येत आहे.  या प्रश्नाला वाचा फोडणार आहे तुम्ही वीज दरवाढी विरोधात हरकती तक्रारी नोंदवा यासाठी आपण लढा देणार आहोत असे त्यांनी सांगितले .  
 प्रास्ताविक करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे म्हणाले, आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेत जुलमी वीज दरवाढ विरोधात जागरूकता दाखवली आहे यापूर्वीही त्यांनी जनतेच्या काळजीपोटी   नगरपालिका घरपट्टीत  दिलासा मिळवून  दिला यात राजकारण नाही ही लढाई आपल्या हितासाठी आहे. तेंव्हा आता नागरिकांनो बघ्याची भुमिका घेवू नका, असे आवाहन केले. 
ॲड. विद्यासागर शिंदे यांनी लाईट बिलाच्या तपशिलाचे वाचन करून दाखला देत कशाप्रकारे ग्राहकांची लूट होत असल्याचे निदर्शनास आणले. वीज दरवाढ करण्यापेक्षा  महावितरणने वीज गळती, वीज चोरी बरोबरच भ्रष्टाचारास आळा घालत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रभावी व्यवस्थापन करून काटकसरीचे धोरण राबवणे अत्यावश्यक आहे. वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे, खाजगी वीज प्रकल्पातून कमीत कमी दराने वीज खरेदी करणे तसेच सौर ऊर्जा व पवन ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या बाबी अंमलात आणल्या तर मोठी आर्थिक बचत होऊ शकते व विज दरवाढ करण्याची वेळ येणार नाही, असे मत व्यक्त केले.
यावेळी  राजेंद्र खिल्लारी, तुषार विद्वंस, सुधीर डागा,  ज्येष्ठ विधीज्ञ देव यांनी आपले मते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अशोक  आव्हाटे  यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page