अधिकाऱ्यांनो जनतेचा संयम सुटल्यास आम्ही जबाबदार नाही –  विवेक कोल्हे

अधिकाऱ्यांनो जनतेचा संयम सुटल्यास आम्ही जबाबदार नाही –  विवेक कोल्हे

Officials, we are not responsible if people lose their patience – Vivek Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 6 Feb23 , 19.50 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगांव : साडेतीन वर्षापासून तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विकास निधीतील सामाजिक सभागृहाचे काम न करता थातूरमातूर उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांनो जनतेचा संयम सुटल्यास आम्ही जबाबदार नाही  अशा कडक शब्दात जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सोमवारी तहसील  कार्यालय येथील समस्या निवारण जनता दरबार  बैठकीत कामात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना  सुनावले.मतदार संघातील प्रलंबीत कामांच्या निवेदनांचा व व्यक्तीगत कामाचा पाऊस पडला.

यावेळी तहसिलदार विजय बोरुडे, नायब तहसिलदार पी. डी. पवार, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे गाडे, वीज वितरण कंपनी, नगरपालिका आदि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते 
     
   विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, 
राज्यात व जिल्हयात आपलेच शासन आहे. पालकमंत्री देखील याच जिल्हयातील आहेत, महसुल स्तरावर प्रश्न सुटत नसतील तर मग आम्ही काय समजावे. ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नाचे जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांना  गांभीर्य नाही. ती लोकांना भेटत नाही त्यामुळे हे लोक आमच्याकडे येतात ते जनतेचे प्रश्न जनता दरबाराच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर मांडतो तेंव्हा जबाबदार अधिकाऱ्यांनी सार्वजनिकसह व्यक्तीगत प्रश्नांची तातडीने सोडवणुक करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.
          
            
खराब  रस्ते  चाऱ्या पोटचाऱ्या क्रॉसींगची कामे तात्काळ सुरू करावी, रस्त्यावरील अतिक्रमण काढावे, हनुमान वाडी ते भोजडे रस्ता त्वरीत सुरळीत करावा, घारी गावाला पुर्वीच्या स्वस्त धान्य पुरवरादाराकडून वेळेत शिधा मिळत होता आता त्यात हलगर्जीपणा होतो आहे, धारणगाव येथे गेल्या वर्षभरापासून स्वस्तधान्य दुकान तात्पुरत्या स्वरुपात आहे ते कायमस्वरूपी करावे, माहेगांव देशमुख येथे सर्व्हर उपलब्ध होत नसल्याने स्वस्त धान्य माल घेणाऱ्यांना ताटकळत बसावे लागते, घारी व डाऊच बुद्रुकसाठी स्वतंत्र सजा करावी, गोधेगांव कोकमठान सह अन्य गावात गावंशिवार बरोबरच रस्त्यांचे असंख्य प्रश्न प्रलंबीत आहे ते मागी लावावे,२०२०  मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान अजुनही शेतकऱ्यांना मिळालेले नाही त्याचे त्वरीत वाटप करावे, झगडे फाटा ते रांजणगांव देशमुख रस्त्याची चाळणी झाली आहे.हा रस्ता वाहतुकीस योग्य नाही, त्याचे खडडे बुजविण्यापेक्षा मजबुतीकरणाचे काम हाती घ्यावे, २०२२ मधील अतिवृष्टीचे अनुदान त्वरीत मिळावे. ठेकेदारांच्या भलावणीसाठी जनतेला वेठीस धरू नका, पंचायत समितीत ठरावीक गटाचीच विकास कामे होत आहेत., माहेगाव देशमुख गायगोठ्यांचे प्रकरणे जाणुनबुजुन पूर्ण केली जात नाही अशा तक्रारींचा पाढा विवेक कोल्हे यांनी यावेळेस अधिकाऱ्यांसमोर वाचला 
             
यावेळी संचालक रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे, शिवाजी कदम, प्रदीप नवले, भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सरपंच रविंद्र आगवण, भिमा संवत्सरकर, चंद्रभान रोहोम, एल. डी. पानगव्हाणे, कैलास राहणे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते. शेवटी भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आभार मानले.

चौकट

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाची स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेतला जाईल-  विवेक कोल्हे

Leave a Reply

You cannot copy content of this page