स्व. शंकरराव कोल्हे हे राजकारण, समाजकारण व सहकार चळवळीतील एक दीपस्तंभ – ना. अतुल सावे

स्व. शंकरराव कोल्हे हे राजकारण, समाजकारण व सहकार चळवळीतील एक दीपस्तंभ – ना. अतुल सावे

s. Shankarao Kolhe is a beacon in politics, social cause and cooperative movement – No. Atul Save

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir10 Feb23 , 19.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : शेती, पाणी, सहकार, साखर कारखानदारी आदी विषयांचा दांडग्या अभ्यासातुन त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सहकार, कृषी, साखर उद्योग, शिक्षण क्षेत्रात मोलाची व बहुमोल कामगिरी  केली आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा कायापालट घडवून आणणारे  स्व. शंकरराव कोल्हे हे राजकारण, समाजकारण व सहकार चळवळीतील एक दीपस्तंभ असल्याची गौरवउद्गार महाराष्ट्राचे सहकार आणि इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा भाजपचे नेते अतुल  सावे यांनी आज शुक्रवारी (१० फेब्रुवारी) भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या येसगाव येथील निवासस्थानी सदिच्छा भेटीत व्यक्त केले.

यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजीआमदार स्नेहलता कोल्हे  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी  त्यांंचे स्वागत केले. 


ना. सावे यांनी माजी मंत्री  स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. तसेच श्रीमती सिंधुताई (माई) कोल्हे यांचे आशीर्वाद घेतले. कोल्हे परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

 स्व. शंकरराव कोल्हे आणि स्व. मोरेश्वरराव सावे यांचे अतिशय जिव्हाळ्याचे, स्नेहाचे संबंध होते. हा ऋणानुबंध आजही कायम आहे.  आज कोल्हे परिवारातील सदस्यांसोबत चर्चा करताना सहकारमंत्री ना. अतुल सावे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 
विवेक कोल्हे यांनी  कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी उद्योग समूहामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मंत्री ना. अतुल सावे यांना दिली.

स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पश्चात बिपीनदादा कोल्हे, स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे तसेच संपूर्ण कोल्हे परिवार त्यांचा आदर्श विचार पुढे नेत निरपेक्ष भावनेने जनसेवा करताना  कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या व विकासाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे परिवार शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहे याबद्दल ना. सावे यांनी समाधान व्यक्त केले 

चौकट
याप्रसंगी स्नेहलता कोल्हे व विवेक मतदार संघातील विविध प्रश्न प्रश्नावर चर्चा केली व ते प्रश्न मार्गी लावण्याची मागणी  ना. अतुल सावे यांच्या कडे केली त्या मागणीला ना. सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

.

Leave a Reply

You cannot copy content of this page