समता पतसंस्थेची कार्यप्रणाली राज्यभर राबण्यासाठी सहकार खाते पुढाकार घेईल – ना. अतुल सावे

समता पतसंस्थेची कार्यप्रणाली राज्यभर राबण्यासाठी सहकार खाते पुढाकार घेईल – ना. अतुल सावे

Cooperative Accounts will take the initiative to implement the functioning of Samata Credit Institutions across the state – N. Atul Save

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir10 Feb23 , 19.10 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : देशासह परदेशातील पतसंस्था व बँकांना लाजवील असा कारभार असलेल्या समता पतसंस्थेची कार्यप्रणाली राज्यातील पतसंराज्यभर पतसंस्थेत राबविण्यासाठी सहकार खाते पुढाकार घेईल अशी ग्वाही सहकार मंत्री ना. अतुल सावे यांनी शुक्रवारी (१०) रोजी कोपरगाव येथील  समता पतसंस्थेला दिलेल्या सदिच्छा भेटीत  दिली. फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील पतसंस्था आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न अध्यक्ष काका कोयटे करीत आहेत.संदीप कोयटे यांच्याप्रमाणे तरुणांनी पतसंस्था चळवळीत सहभाग घ्यावा असेही ते म्हणाले,

या भेटीत नामदार सावे यांनी पेपरलेस बँकिंग प्रणाली, व्हाउचेरल बँकिंग प्रणाली, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, समता वसुली पॅटर्न, समता सुधन गोल्ड लोन योजना, समता सहकार उद्योग मंदिर, समताज सहकार मिनी मॉल यासह समता पतसंस्थेच्या कार्यप्रणालीमध्ये आणलेल्या नवनवीन संकल्पनांची माहिती घेतली.  विविध योजना व उपक्रम बघून ते प्रभावित झाले.
 यावेळी ना. अतुल सावे यांच्या हस्ते
 भारतातील सहकार क्षेत्रातील पहिले स्टार्ट अप सुधन गोल्ड लोनचे ब्रँड जिंगलचे उद्घाटन करण्यात आले.
संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा जनरल मॅनेजर सचिन भट्टड व ठेव प्रमुख संजय पारखे यांनी चित्रफितीच्या आधारे सादर केला.
 यावेळी समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे, जेष्ठ संचालक रामचंद्र बागरेचा, चांगदेव शिरोडे, .जितुभाई शहा . कचरू मोकळ, .गुलशन होडे , . संदीप कोयटे, .निरव रावलिया  संचालिका सौ.शोभा अशोक दरक,.भरत अजमेरे,सहकार विभाग. अभिजित पाटील,  सहाय्यक निबंधक .नामदेव ठोंबळ,अंतर्गत ऑडिटर.स्वप्नील घन, राहाता तालुका फेडरेशनचे अध्यक्ष .राजेंद्र वाबळे, चेअरमन स्वाधीन गाडेकर, समता पतसंस्थेचे अधिकारी,  शाखाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी मानले.

कोट – समता पतसंस्थेने तयार केलेल्या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमच्या माध्यमातून ९९.६७ टक्के ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असून प्रत्येकी २५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना सुरक्षितता,. तसेच संस्थेचे एकूण  ५४७ कोटी  कर्ज वाटपापैकी २२४ कोटी सोनेतारण कर्ज हे जगातील अतिसुरक्षित कर्ज आहे. -काका कोयटे चेअरमन , समता पतसंस्था

Leave a Reply

You cannot copy content of this page