ब्राह्मणगाव विज उपकेंद्रासाठी ४.८५ कोटी प्राप्त – आ. आशुतोष काळे
4.85 crore received for Brahmangaon Power Sub-centre – Aa. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat11 Feb23 , 20.10 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : विधानसभा मतदार संघातील ब्राह्मणगाव येथे महा विकास आघाडी कडून मंजूर करून घेतला होता त्याचा पाठपुरावा केल्याने नवीन ३३/११ के. व्ही. वीज उपकेंद्र उभारणीसाठी ४.८५कोटीच्या कामाचा व वारी वीज उपकेंद्राच्या ६० लखाच्या क्षमता वाढ कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्याने कोपरगाव तालुक्यातील वारी, ब्राम्हणगावसह पंचक्रोशीतील गावांचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी लागला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कोपरगाव मतदार संघातील विजेच्या समस्या गंभीर होत्या. त्याबाबत महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर अनेक वीज उपकेंद्राच्या क्षमता वाढविण्याबरोबरच नवीन उपकेंद्र देखील मंजूर करून घेतले होते. या मंजूर केलेल्या उपकेंद्राच्या नियोजित कामासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू होता. आता निधी मिळाल्यामुळे
मागील अनेक दिवसांपासूनच्या ब्राम्हणगाव व परिसरातील टाकळी, सोनारी, धारणगाव गावातील नागरिकांच्या विजेच्या समस्या कायमच्या दूर होणार आहेत. त्याचबरोबर या नवीन वीज उपकेंद्राच्या निर्मितीमुळे चास, रवंदे या वीज उपकेंद्राचा भार देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्यामुळे या वीज उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांचा देखील वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने होणार आहे.
मतदार संघाच्या पूर्व भागातील वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी देखील मंजुरी मिळाली असून कामासाठी. ऊर्जा विभागाने या कामासाठी ६० लाखाच्या निविदा प्रसिद्ध केल्या असून ३ एम. व्ही. ए. ची क्षमता असलेले वारी वीज उपकेंद्र ५ एम. व्ही. करण्याचा कार्यारंभ आदेश देखील प्राप्त झाला आहे. लवकरच हे देखील काम सुरू होणार आहे. त्यामुळे मतदार संघातील अत्यंत महत्वाचा असलेला विजेचा प्रश्न बहुतांशी प्रमाणात मार्गी लावण्यात यश मिळाले असल्याचे समाधान आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केले
Post Views:
136