डबल इंजिन सरकारमुळेच ब्राह्मणगाव व वारी उपकेंद्रासाठी निधी मिळाला – स्नेहलता कोल्हे
It was because of the double engine government that funds were obtained for Brahmangaon and Wari sub-centres – Snehalata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat11 Feb23 , 20.20 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: तात्कालीन युती सरकारच्या काळात मी मंजुरी मिळवली तर आजच्या डबल इंजिन सरकारच्या काळात नवीन ब्राह्मणगाव उपकेंद्रास ४.८५ कोटी, तर वारी उपकेंद्राच्या वाढीव क्षमतेसाठी ६० लाखाचा प्रत्यक्ष निधी मिळविण्यात मला यश मिळाले म्हणूनच ब्राह्मणगाव व वारी परिसरातील प्रलंबित असलेला विजेचा प्रश्न सहा वर्षानंतर सुटला असल्याची माहिती भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना आपण तत्कालीन युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरण व महापारेषण कंपनीचे नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता, अहमदनगर विभागाचे अधीक्षक अभियंता, संगमनेरचे कार्यकारी अभियंता, कोपरगाव ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आदींना निवेदन देऊन वारी आणि रवंदे येथील विद्युत उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची तसेच ब्राह्मणगाव व धामोरी येथे नवीन ३३/११ के. व्ही. विद्युत उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी सन २०१६ पासून राज्य सरकारकडे लावून धरली होती.२० एप्रिल २०१८ रोजी तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंजुरी दिली होती. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हे काम रखडले होते. पुन्हा सत्तांतर होऊन डबल इंजिन सरकार सत्तेवर आल्यानंतर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आजचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा या कामासाठी पाठपुरावा केल्यानेच ब्राह्मणगाव येथे ४.८५ कोटीचा निधीतून होणा-या नवीन विद्युत उपकेंद्राच्या निर्मितीमुळे ब्राह्मणगाव व परिसरातील नागरिकांची व शेतकऱ्यांची विजेची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे. शिवाय, चासनळी, रवंदे या वीज उपकेंद्रावर पडणारा विजेचा भार मोठ्या प्रमाणात कमी होऊन या वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होणार आहे.
तर वारी उपकेंद्राच्या वाढीव कामासाठी ६० लाखाचा निधी मिळाल्यामुळे आता क्षमता ३ एम. व्ही. ए. वरून ५ एम. व्ही. ए. करण्यात येणार असल्यामुळे या सर्व गावांतील घरगुती व कृषिपंपांचा वापर करणाऱ्या वीज ग्राहकांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकार मध्ये नमूद करण्यात आले आहे म्हटले आहे.
Post Views:
140