कोपरगावच्या ग्रामीण भागातील रस्त्यासाठी   ८० लाखाच्या निविदा प्रसिद्ध – आ.आशुतोष काळे

कोपरगावच्या ग्रामीण भागातील रस्त्यासाठी   ८० लाखाच्या निविदा प्रसिद्ध – आ.आशुतोष काळे

   

 Tender of 80 lakhs released for road in rural area of ​​Kopargaon – Mr. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue14 Feb23 , 16.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  मतदार संघातील वडगाव, करंजी, बोकटा, बेस, बहादराबाद कोळपेवाडी या गावातील रस्त्याच्या  नूतनीकरण कामाच्या जिल्हा नियोजन समितीकडून ८० लाखाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

  प्रसिद्ध करण्यात आलेल्या ८० लाखाच्या निविदा मतदार संघातील पुढील कामांच्या असून यामध्ये वडगाव येथील दौलत बाबुराव सोनवणे घर ते संजय सोनवणे घर १.०५ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे, करंजी येथील करंजी ग्रा.मा. ७५ ते बोकटा जिल्हा हद्द ०१ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे, वेस येथील वेस ग्रा. मा. ५२ ते जालिंदर कोल्हे घर ते बहादराबाद हद्द ०१ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे व कोळपेवाडी येथील रा.मा. ७ ते कोळपेवाडी (ग्रा.मा. १०१) वरील दीपक ढोणे घराजवळील नाला सि.डी. वर्क करणे वरील सर्व कामांसाठी या ८० लाख रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे येत्या काही दिवसातच या सर्वच रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून वरील सर्व गावातील नागरिकांना येत असलेली  मोठी अडचण दूर होणार आहे. यामुळे या गावातील नागरिकांमध्ये समाधान पसरले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page