पालिकेच्या एम.के.आढाव विद्यालयाचा शालेय क्रीडा महोत्सव सुरू
School sports festival of M.K.Adhav Vidyalaya of Municipality started
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue14 Feb23 , 16.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव: माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आणि नगर परिषद शिक्षण मंडळ कोपरगाव यांचे मार्फत आयोजित शालेय क्रीडा महोत्सवाची सुरुवात मंगळवारी 14 रोजी करण्यात आली अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी हे होते.
याप्रसंगी माजी नगरसेवक सुनील गंगुले, अमृत संजीवनी चे अध्यक्ष पराग संधान, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री.पटारे ,कोपरगाव उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,प्रसिद्ध उद्योजक सोमेश कायस्त आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक शिक्षक श्री,वळवी यांनी केले.
या क्रीडा महोत्सवात खो-खो, कब्बडी, लिंबू चमचा इ.मैदानी खेळांचा समावेश आहे .
सुनिल गंगुले म्हणाले कि शिक्षणा बरोबरच मैदानी खेळ देखिल महत्वाचे आहे.मैदानी खेळ खेळल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहतेच त्याच बरोबर आपल्याला जर कधी अपयश आले ते पचविण्याची शक्ती मिळते.
पराग संधान म्हणाले, खेळ हा व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. कोणत्याही खेळात मिळविलेले प्राविण्य आपले करियर घडवू शकते .
अधिकारी शांताराम गोसावी म्हणाले,विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यक्रमाबरोबरच खेळही खेळले पाहिजे जेणे करून बुद्धी विकास बरोबरच शारीरिक विकास देखिल तितकाच महत्वाचा असतो असे सांगितले.आजच्या आधुनिक युगात आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्याचाच एक भाग म्हणून सिंगलयुज प्लास्टिक हा आहे. विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सांभाळून जर आपल्या घरातील व आपल्या घरा शेजारील रहिवाश्यांकडून अशा प्लास्टिक चे संकलन करून नगरपरिषदेच्या प्लास्टिक संकलन केंद्रावर जमा केल्यास प्रती किलो रु.पन्नास शालेय वस्तूंसाठी दिले जातील असे असे सांगून क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाबाबत आयोजकांचे कौतुक केले
कार्यक्रमाचे आयोजन एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आणि नगरपरिषद शिक्षण मंडळ कोपरगाव यांचे मार्फत करण्यात आले होते. सूत्र संचलन शिक्षिका बोराडे मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्स्वीतते साठी एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या सर्व शिक्षक ,कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.