युवर ड्रीम करीअर : स्मार्ट इंजिनियर बनण्यासाठी योग्य डोमेन निवडा – अर्श गोयल
Your Dream Career : Choose the Right Domain to Become a Smart Engineer – Arsh Goyal
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir17 Feb23 , 17.40 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगांव: प्रत्येक देशात स्पर्धा आहे. या स्पर्धेतील आपणही एक घटक आहोत. कंपन्यांना समस्या सोडविणारे स्मार्ट इंजिनिअर्स आवश्यक असतात. त्यासाठी योग्य डोमेन (ज्ञानाचे किंवा कार्याचे क्षेत्र) निवडणेही तितकेच महत्वाचे असते, असे असे प्रतिपादन सॅमसंग कंपनीचे सिनिअर साॅफ्टवेअर इंजिनिअर अर्श गोयल यांनी युवर ड्रीम करिअर या विषयावर मार्गदर्शन करताना केले.
गोयल पुढे म्हणाले की,अभियांत्रिकी शिक्षणातील महत्त्वाच्या अंतिम टप्पात चांगले कष्ट घेवुन स्वतःला विकसित केले तर चांगले करिअर घडतेच, संगणक क्षेत्राताल चांगल्या पॅकेजच्या नोकरीसाठी एक आवड असलेली चांगली प्रोग्रामिंग भाषा निवडावी, डेटा स्ट्रक्चर विषयाचा चांगला अभ्यास करावा, संगणक विषयी मुलभुत गोष्टी माहिती करून घ्याव्यात व विविध प्रकल्पांवर काम करावे, या चार सुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी केल्यास गुगल, मायक्रोसाॅफ्ट, अमेझाॅन, आयबीएम, इत्यादी चांगल्या कंपन्यांमध्ये रू ४० लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळु शकते.
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात काॅम्प्युटर इंजिनिअरींग विभाग वतीने आयोजीत काॅम्प्युटर, आयटी व इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअरींगच्या विध्यार्थ्यांना युवर ड्रीम करिअर यावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी श्री गोयल यांनी विध्यार्थ्यांना महाविद्यालयात कोणत्या कंपन्यांचे प्रतिनिधी परीसर मुलाखतीसाठी येतात व कोणत्या कंपन्यांना कोणती कौशल्ये अपेक्षित आहे, या विचारलेल्या प्रश्नावर विध्यार्थ्यांनी अचुक उत्तरे दिली. श्री गोयल यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला चांगले ज्ञान तर मिळालेच, परंतु चांगल्या पॅकेजच्या नोकरीसाठी एक दिशा दर्शक मार्गही मिळाला, अशा प्रतिक्रिया विध्यार्थ्यांनी दिल्या.
यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी, डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, काॅम्प्युटर विभागाचे प्रमुख डाॅ. डी. बी. क्षिरसागर, आदी उपस्थित होते.
प्रा. अतुल मोकळ यांनी आभार मानले, तर डाॅ. एस. आर. देशमुख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परीश्रम घेतले.
प्रा. अतुल मोकळ यांनी आभार मानले, तर डाॅ. एस. आर. देशमुख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परीश्रम घेतले.