राज्याबाहेर  कांदा जाईना, निर्यात होईना;  राज्यातील लाल कांद्याचे भाव कोसळले

राज्याबाहेर  कांदा जाईना, निर्यात होईना;  राज्यातील लाल कांद्याचे भाव कोसळले

Onions shall not go outside the state, shall not be exported; The price of red onion in the state collapsed

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir17 Feb23 , 17.50 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  गुजरात, पश्चिम बंगालमधील सुखसागर, राजस्थान अलवर व शिखर राजस्थान येथे मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याची आवक झाल्याने राज्याबाहेर कांदा जाईना व निर्यात होईना त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या लाल कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. कोपरगाव मुख्य बाजार समितीत व शिरसगाव येथील बाजार समितीचे आजचे भाव ३५० ते साडेसहाशे रुपये प्रतिक्विंटल राहिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.   

कोंडी कधी आणि कशी फुटणार?

साधारणपणे दिवाळीच्या दरम्यान लाल कांदा बाजारात येऊ लागतो. लाल कांद्याची आवक बघून बाजार समितीमध्ये कांद्याचे दर व्यापारी ठरवले जातात. मात्र, यंदाच्या वर्षी २ ते ३ हजारापर्यंत असणारे लाल कांद्याचे दर आता १ हजाराच्या खाली येऊन ठेपले आहेत.            लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव ६०० ते ८०० रुपये पर्यंतखाली आल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने चिंताग्रस्त झाला आहे.

शेजारील राज्यात कांद्याची आवक वाढलेली असून कांद्याचे भाव कोसळल्याने राज्यातील कांदा बाहेर जाऊ शकत नाही तर निर्यात बंद असल्यामुळे देशाबाहेरही  कांदा  पाठवता येत नाही यामुळे कांद्याचे प्रमुख मार्केट असलेल्या  ६०० लासलगावमध्ये कांद्याचे भाव इतक्या कमीवर आले आहेत. मग इतर बाजार समित्यांचे विचारूच नका. आता कांदा यायला सुरुवात झालीय. ही आवक वाढल्यानंतर पु्न्हा कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्नय. एक तर हवामान साथ देत नाही. त्यात कधी अतिवृष्टी, तर कधी अवकाळी पावसाने पीक मातीमोल होते. जेव्हा पीक येते, तेव्हा भाव नसतो. त्यामुळे जगायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ही कोंडी कधी आणि कशी फुटणार असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

कोपरगाव मुख्य बाजार समिती २८० क्विंटल कांदा आयात होऊन त्यास ३५० ते ६५० रुपये भाव मिळाला आहे तर उपबाजार समिती शिरसगाव येथे ४४०० क्विंटल कांद्यासही तोच भाव मिळाला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.कवडीमोल भावाने कांद्याची विक्री करावी लागत असल्याने उत्पादन खर्च कसा मिळवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. बाजार समितीमध्ये आल्यानंतर कांद्याची किंमत अत्यंत कवडीमोल भावात व्यापारी करत असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.        

कोट

कांदा केंद्र शासनाने निर्यात करावा व कांद्याला व शेतकऱ्यांना भाव मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे. सध्या द्राक्षाचा सीजन मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने कांदा वाहतुकीसाठी वाहने मिळत नाही त्यांनीही भाव वाढवले आहेत. लाल कांदा वाढदिवस साठवता येत नाही उन्हाळ कांदा शेतकरी साठवून ठेवतो. दुबई मलेशिया सिंगापूर श्रीलंका येथे मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात होत असतो. सध्या रेल्वे ट्रॅक द्वारे पटना सिलिगुडी गुवाहाटी कलकत्ता मालदा येथे दररोज १६ हजार क्विंटल कांदा जात आहे परंतु भावना असल्याने तेथेही कांद्याला मार्केट नाही. असे कोपरगावचे कांदा व्यापारी महेंद्र ठक्कर यांनी सांगितले.                           

Leave a Reply

You cannot copy content of this page