शिक्षक भरा,७२  वर्षाच्या वृद्धाचे  आमरण उपोषण ; शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्य यांचा  राजीनामा 

शिक्षक भरा,७२  वर्षाच्या वृद्धाचे  आमरण उपोषण ; शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्य यांचा  राजीनामा 

Teacher Bhara, 72-year-old on hunger strike; Resignation of Women Member of School Management Committee

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon20 Feb23 ,20.10 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :तालुक्यातील सोनेवाडी येथील शाळेतील तीन शिक्षकांच्या रिक्त जागा भरा यासाठी इशारा दिल्यानंतरही शिक्षण मंडळाकडून कारवाई न झाल्याने ७२  वर्षाच्या वृद्धाने आमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणास  स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या एका महिला सदस्याने  राजीनामे देऊन पाठिंबा दिला आहे तर ग्रामस्थांसह पालकांचा  मोठा  पाठिंबा उपोषणास मिळत आहे

 तालुक्यातील सोनेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीन शिक्षक कमी आहेत.पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या या शाळेत कोपरगाव शिक्षण विभागाने किमान दोन शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी ७२ वर्षाचे आजोबा अशोक घोडेराव यांनी आमरण उपोषणास काल सोमवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी गेट समोर सुरवात केली आहे.
त्यांच्या उपोषणाला सोनेवाडी ग्रामस्थांसह पालकांनी  पाठिंबा दर्शवलाय. घोडेराव यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर समर्थनार्थासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या मंगल कर्णासाहेब जावळे यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देत आपला निषेध नोंदवला.
 जर शाळेचे प्रश्न गेल्या वर्षापासून  शिक्षण विभागाचे पाठपुरावा करूनही सुटत नसतील तर या सदस्य पदाचा काय उपयोग आहे असे त्यांनी सांगितले.
 उपोषणाची चर्चा होताच शिक्षण विभागाकडून जायपत्रे प्राथमिक वस्ती शाळेतील एका शिक्षकाला सोनेवाडी  शाळेत पाठवून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र उपोषणकर्ते अशोक घोडेराव हे आपल्या उपोषणावर ठाम राहिले असून कोपरगाव तालुका शिक्षण विभाग या उपोषणाला कशा पद्धतीने हाताळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
उपोषणाच्या वेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. मिळाले पाहिजे मिळाले पाहिजे शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे, शिक्षक द्या शिक्षक द्या शाळा चालू करा अदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिक्षक मतदार संघाचे डॉ सुधिर तांबे, आ. सत्यजित तांबे, युवा नेते विवेक कोल्हे, शिवसेनेचे  नितीन औताडे, प्रमोद लबडे त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करत प्रशासनाला मार्ग काढण्यासाठी सुचना केल्या.यावेळी सोपान गुडघे, हरिभाऊ जावळे, काकासाहेब जावळे,धर्मा जावळे,मिनानाथ गुडघे, उदय घोंगडे,पी. डी. आहेर,रवि आहेर, कर्णा जावळे, बबलु जावळे, किसन जावळे, विठ्ठल जावळे, विनायक चव्हाण, बाळासाहेब जावळे, तुळशीराम सोदक, शिवाजी दहे, शशीकांत चव्हाण, बाबासाहेब गुरसळ,गिताराम जावळे, लक्ष्मण जावळे,भाऊसाहेब जावळे, भास्कर जावळे, गणेश सोनवणे, सोमनाथ रायभान, रामभाऊ जावळे, शिवाजी जावळे, आप्पासाहेब जावळे अदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page