परीक्षांच्या तोंडावर बेमुदत संप, सद्गुरु गंगागीर महाराज महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन
Sadhguru Gangagir Maharaj College non-teaching staff protest indefinite strike ahead of exams
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon20 Feb23 ,20.20 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : येथील सद्गुरु गंगागीर महाराज महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांच्या निर्देशानुसार बेमुदत संप सोमवारपासून (दि.२०) सुरु झाला. महाविद्यालयातील ५७ शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी आहेत.
बेमुदत संपाच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयाच्या गेटसमोर शहरातील अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात निदर्शने व घोषणा देऊन आंदोलन सुरू केले. अशी माहिती कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी यांनी दिली.
सुनील गोसावी पुढे म्हणाले की महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही तरी आम्ही २ फेब्रुवारी २०२३ पासून विद्यापीठ परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे व हा संप पुढे चालू ठेवत आहोत १५ फेब्रुवारी २०२३ रोजी आम्ही महाविद्यालय प्रवेशद्वारासमोर निदर्शने करून लाक्षणिक संप १६ फेब्रूवारी ला सरकारचे लक्ष वेधले होते परंतु सरकारने अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही म्हणून दि. २०फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत संपावर जाण्याचे ठरवले आहे . पुढील मागण्यासाठी हा संप आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत .कार्यालयीन सेवकांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना कायम ठेवणे, १ जानेवारी २०१६पासून सातवा वेतन आयोग निश्चिती करणे व महाविद्यालयीन रिक्त जागा भरण्यास सरकारने परवानगी देणे, २००५ नंतरची जुनी पेन्शन योजना सेवेत रजू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करून कालबाह्य पदोन्नती १०-२०-३० अशी चालू करणे यासारख्या मागण्या घोषणा देत सेवकांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले .
या संपामध्ये गंगागीर महाराज महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी, साळवे बी. एस. सागर कांबळे सतीश जाधव , श्रीमती जानराव आर.ए. प्रवीण मोकळ. मोरेश बांगर, बाळासाहेब व्यवहारे , दत्ता तांबे , संजय कुदळे सोमनाथ तारडे , भारत गोरे शिवाजी आरोटे, दिलीप दुशिंग,दीपक हंडोरे, हरिचन्द्र जाधव, श्रीमती वैशाली कदम श्रीमती लता शिंदे आदीसह कर्मचारी संपामध्ये सहभागी असून या संपाला प्राचार्य, व्यवस्थापन मंडळ व प्राध्यापक संघटना ,विद्यार्थी ,पालक यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे.
Post Views:
139