शिर्डीच्या अवजड वाहतुकीचा भार उचलणारा वडगाव पान रस्ता राष्ट्रीय महामार्ग व्हावा – आ. काळे
Vadgaon Pan Road, which carries the burden of Shirdi’s heavy traffic, should become a national highway – A. Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon20 Feb23 ,20.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शिर्डीच्या अवजड वाहतुकीचा भार उचलणारा वडगाव पान रस्ता राष्ट्रीय महामार्ग यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव हद्दीतील झगडे फाटा वडगाव पान या रस्त्याच्या १० कोटी कामाच्या भूमिपूजन प्रसंगी दिली अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे होते
नगर मनमाड महामार्गावरील अवजड वाहतुकीमुळे शिर्डीत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणतांबा फाटा येथून झगडे फाटा वडगाव पान संगमनेर या मार्गाने अवजड वाहतूक वळविण्यात येते. त्यामुळे राज्य मार्ग असलेल्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे.पुणतांबा फाटा ते झगडे फाटा, झगडे फाटा ते सावळीविहीर फाटा, तळेगाव दिघे-लोणी, नांदूर शिंगोटे हे सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्ग असून अवजड वाहतुकीचा भार उचलणारा वडगाव पान हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग होणे गरजेचे आहे . यासाठी आपण केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार काळे यांनी यावेळी सांगितले
राज्य मार्ग ६५ च्या गेल्या पाच सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या दहा कोटीच्या कामास आज प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच परिसरातील पोहेगाव-वेस रस्त्यासह सर्वच प्रमुख रस्त्यांसाठी निधी देणार आहे. रांजणगाव देशमुख ते बहादरपूर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मंजूर झाला असून या रस्त्याचे देखील काम लवकरच सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अशोक रोहमारे म्हणाले की, आ आशुतोष काळे यांच्या रूपाने मतदारसंघाला चांगला आमदार लाभलेला आहे काळे कारखानाही त्यांनी काळे कारखाना सुद्धा नफ्यात आणला, असल्याचे गौरवउद्धार व्यक्त केले. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मंदावलेली पोहेगाव ची बाजारपेठ आता रस्ता झाल्यावर पुन्हा फुलेल, असा आशावाद व्यक्त केला आता या रस्त्यासाठी जुने फोटो टाकून बातम्या देऊन अनेक जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील असा टोला त्यांनी यावेळेस लगावला पंधरा ते वीस वर्ष तरी कोपरगाव मतदार संघाला आ.आशुतोष काळे यांची गरज असून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून मतदार संघाचा विकास करून घ्या असे आवाहन रोहमारे यांनी केले .
याप्रसंगी काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे, सुधाकर रोहोम, राहुल रोहमारे, शंकरराव चव्हाण, प्रविण शिंदे, वसंतराव आभाळे, गंगाधर औताडे, सुनील शिंदे, सचिन रोहमारे, देवेन रोहमारे, दिलीप शिंदे, केशवराव जावळे, सौ. वैशाली आभाळे, आदी सह परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने हजर होते