पोटच्या पाच महिन्याच्या पोराला आईने गळा दाबून मारले व विहिरीत फेकले; 

पोटच्या पाच महिन्याच्या पोराला आईने गळा दाबून मारले व विहिरीत फेकले;

A five-month-old baby boy was strangled by his mother and thrown into a well;

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon20 Feb23 ,20.40 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : पोरगा माझा नाही असे नवरा वारंवार म्हणून भांडत असे यामुळे आईने पोटच्या  पाच महिने सात दिवसाच्या कोवळ्या पोराला मारहाण करून गळा दाबून ठार मारले खुनाचा आळ येवू नये म्हणून या कोवळया जिवाचे प्रेत विहीरीत टाकून दिले व मुलाचे अपहरण केल्याचा बनाव केला.ही दुर्दैवी घटना कोपरगाव तालुक्यातील कारवाडी  गावात घडली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदरील  आईला कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे. 

कारवाडी (ता. कोपरगाव) येथील  गायत्री सुरज माळी (२०) ही महिला पतीसह कारवाडी येथे राहात होती. या महिलेचे लग्नापूर्वी गावातीलच परपुरुषाबरोबर अनैतिक संबंध होते हे संबंध तिने सुरज शंकर माळी यास लग्न करण्यापूर्वी सांगितले होते. त्यानंतर तीस शुभम हा मुलगा झाला.सोमवारी (१९) रोजी नवरा शुभम हा माझा मुलगा नाही असे म्हटल्यामुळे दोघात वाद झाले नवरा मजुरी कामावर गेल्यानंतर  सदर महिलेने शुभम यास मारहाण करून गळा दाबून मारून टाकले व   खुनाचा आळ येवू नये म्हणून या कोवळया जिवाचे प्रेत   सुधाकर दंडवते यांच्या विहिरीत फेकून दिले यानंतर दोन दाढीवाल्यांनी 
मुलाला पळवून नेल्याचा कांगावा केला. 
 वरील महिलेसह पती व आणखी गावातील काही लोक कोपरगांव येथे ग्रामिण पोलीस स्टेशनला आले व मुलगा शुभम यास पळवून नेल्याची तक्रार केली परंतु पळवून नेणारी माणसे शोधुनही न सापडल्याने पोलीसांना सदर महिलेचे वर्तन संशयास्पद वाटले व पोलीसांनी त्यांचा खाक्या या महिलेला दाखवताच तिने गुन्हयाची कबुली दिली व मीच माझ्या हाताने मुलाला मारहाण करुन गळा दाबला व त्याचा खुन केल्याचे, त्याचे प्रेत दंडवते यांच्या विहीरीत टाकल्याचे सांगितले. त्याप्रमाणे पोलीसांनी गायत्री सुरज माळी या महिलेस ताब्यात घेवून मुलाचा वरील विहीरीत शोध घेतला असता त्याचे प्रेत आढळून आले या प्रकरणी पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.ई. सुशांत धाकराव हे पुढील तपास करीत आहेत. 

Leave a Reply

You cannot copy content of this page