विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू; शेतमालकावर गुन्हा दाखल
Youth dies of electrocution; A case has been registered against the farmer
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon20 Feb23 ,20.50 PmBy राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील धोत्रे येथे रात्रीच्या सुमारास घराजवळील शेतात नैसर्गिक क्रिया करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी शेतमालकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (१८) रोजी सकाळी सात वाजता नैसर्गिक विधी करण्यासाठी प्रकाश दत्तात्रय माळवदे (३५) रा. धोत्रे ता. घरासमोरील शेतात गेले असता आरोपी विनायक ज्ञानदेव घाटे,रा. धोत्रे मजकुर याने त्याच्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी विजेच्या तारेवर अनाधिकृतपणे आकडा इलेक्ट्रिक मोटारकडे शेतातून नेलेल्या दीडशे फूट लांबीच्या केबलच्या जॉईंन्टला योग्य आवरण न लावल्यामुळे मयत प्रकाश माळवदे, यांच्या शरीराचा व विदयुत प्रवाहाचा संपर्क आल्याने त्याच्या मृत्युस कारणीभूत झाला हे तपासावरून निष्पन्न झाल्याने याप्रकरणी पो. हे. कॉ. राजेंद्र मारुती म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेतमालक विनायक ज्ञानदेव घाटे यांच्यावर भादवी कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे पुढील तपास करीत आहे
Post Views:
215