कोपरगाव शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२३ उत्सव समिती जाहीर
Kopargaon Shiv Sena Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 Celebration Committee announced
सांस्कृतिक कार्यक्रम : भगवा सप्ताह साजरा करणारCultural Program: Saffron week will be celebrated
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue21 Feb23 ,11.00 Am
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव उद्धव ठाकरे शहर शिवसेनेची छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव २०२३ समिती जाहीर करण्यात आली. यामध्ये मधुकर पवार यांची अध्यक्षपदी, तर कार्याध्यक्षपदी मयुर दळवी यांची निवड करण्यात आली.
येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख किरण खर्डे,संदीप दळवी,शहरप्रमुख कलविंदर दडियाल, वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,प्रवक्ते राहुल देशपांडे, उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, विकास शर्मा,शेखर कोलते, सहसंघटक अक्षय वाकचौरे, समन्वयक सागर सोमवंशी, प्रवीण शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
यामध्ये उपाध्यक्ष अरुण बोराडे, योगेश उशीर, सुनील कुंढारे, वसीम शेख, सचिव सागर चव्हाण, शिवज्योतप्रमुख रवि पवार, सांस्कृतिक कार्यक्रमप्रमुख संजय बाविस्कर, अशोक पवार,दिपक बरदे,किरण अडांगळे, राज्याभिषेक प्रमुख दिलीप अरगडे,जाफर पठाण, सतीश खर्डे खजिनदार बाळासाहेब साळुंखे या समितीची निवड करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भगवा सप्ताह भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असून या सप्ताह काळात रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा नृत्य स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा विविध शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा बरोबर विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिवजयंती उत्सव समितीकडून देण्यात आली आहे.