कोपरगाव लक्ष्मीनगरचा तांत्रिकपेच सुटला;रहिवाशांना मिळणार जागेचे उतारे आ.- आशुतोष काळे

कोपरगाव लक्ष्मीनगरचा तांत्रिकपेच सुटला;रहिवाशांना मिळणार जागेचे उतारे आ.- आशुतोष काळे

Kopargaon Lakshminagar’s technical problem is solved; the residents will get copies of the land. – Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed22 Feb23 ,11.00 Am
By राजेंद्र सालकर

कोपरगाव  :  शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांना जागेचे उतारे  मिळण्यात असलेला तांत्रिक पेच आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून निकाली निघाल्याने  या प्रश्नातील मार्ग मोकळा   झाल्यामुळे लक्ष्मी नगरच्या रहिवाशांना जागेचे उतारे मिळणार  असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर परिसरात मागील अनेक वर्षापासून शासकीय जागेवर अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. ज्या शासकीय जागेवर हे कुटुंब राहत आहेत त्यांना त्यांच्या जागा शासन नियमानुसार नियमाकुल करून त्यांना त्यांच्या नावचे उतारे मिळावे या प्रलंबित प्रश्नासाठी आमदार आशुतोष काळे यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कमिटीची बैठक घेऊन लक्ष्मीनगर  नागरीकांना त्यांच्या जागा शासकीय नियमाप्रमाणे नियमित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून हे प्रस्ताव तातडीने शासनाकडे दाखल करण्यात आले होते. त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा सुरूच होता.

त्या पाठपुराव्याची दखल घेवून अखेर पुणे नगररचना संचालक, अविनाश पाटील यांनी लक्ष्मीनगरच्या नागरिकांना त्यांच्या जागेचे उतारे देण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सूट देण्यास सहमती दिली आहे. त्यामुळे शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांची मोठी अडचण दूर होवून त्यांना त्यांच्या जागेचे उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. 

याच प्रश्नासाठी  माजी आमदार अशोक काळे यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात पाठपुरावा केला होता. आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे हा प्रश्न निकाली निघाल्याने दिलासा मिळालेल्या नागरिकात समाधानाचे वातावरण आहे 

Leave a Reply

You cannot copy content of this page