पुरस्काराची ऊर्जा पुढील वाटचालीत महत्त्वपूर्णच ! डॉ. माधुरी जावळे

पुरस्काराची ऊर्जा पुढील वाटचालीत महत्त्वपूर्णच ! डॉ. माधुरी जावळे

The energy of the award is important in the next step! Dr. Madhuri Jawle

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed22 Feb23 ,11.10 Am
By राजेंद्र सालकर

कोपरगाव: एखादा महत्त्वपूर्ण पुरस्कार मिळाल्याने पुरस्कार प्राप्तकर्त्याची जबाबदारी वाढत असते. त्यातून अधिक सकारात्मक काम करण्याची ऊर्जा मिळते. ती ऊर्जा पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरते, असे प्रतिपादन नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुणे विद्यापीठ पुरस्कार विजेत्या संजीवनी ग्रामीण एज्युकेशन संस्थेच्या माहीती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. माधुरी जावळे यांनी  केले.

सोनेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शकुंतला गुडघे होत्या. 
तर आनंदराव जावळे, निरंजन गुडघे, आप्पासाहेब जावळे ,शांतीलाल होन, शिवाजी जावळे, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब जावळे, चिलु जावळे, प्रकाश सरोदे, भाऊसाहेब मिंड, तुकाराम जावळे, हेमराज जावळे, प्रवीण खंडीझोड, मच्छिंद्र गुडघे 
 प्रामुख्याने उपस्थित होते. 
डॉ. जावळे म्हणाल्या, मुलगी असली म्हणून काय झाले तेही उच्चशिक्षित झाली पाहिजे अशी वडिलांची इच्छा असल्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुटुंबाने साथ दिल्यामुळे मी कॅम्प्युटर इंजिनिअरिंग पर्यंतचे शिक्षण घेऊ शकले.  संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या २२ वर्षापासून माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख म्हणून काम पाहता आले.नितीनदादा कोल्हे, अमित कोल्हे , प्राचार्य व सहकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच शिक्षण क्षेत्रात काही वेगळे करायचे ठरवले.पहिला पुरस्कार २०१६  साली मिळाला होता. त्यानंतर कामात जिद्द आणि चिकाटी ठेवली आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शैक्षणिक  पुरस्कार  हा माझा पाचवा पुरस्कार आहे. गावाने केलेला सत्कार हा वेगळाच आनंद देऊन जातो अशा ओथंबलेल्या भावना  डॉ. माधुरी जावळे यांनी व्यक्त केल्या. 

Leave a Reply

You cannot copy content of this page