कोपरगाव धामोरीत ऊसतोड मजुराची  गळफास घेऊन आत्महत्या

कोपरगाव धामोरीत ऊसतोड मजुराची  गळफास घेऊन आत्महत्या

A sugarcane worker committed suicide by hanging himself in Kopargaon Dhamori

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed22 Feb23 ,11.20 Am
By राजेंद्र सालकर

कोपरगाव: तालुक्यातील धामोरी  येथे  ऊसतोड मजुराने राहत्या कोपीत  लाकडी बल्लीला  दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मच्छिंद्र नाथा चव्हाण  (वय ४२)  असे त्यांचे नाव असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद कोपरगाव तालुका पोलिसात झाली आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी मच्छिंद्र चव्हाण तळोदे ता. चाळीसगाव जि. जळगाव हे काळे कारखाना गट  ऑफिस धामोरी   येथे बायको, मुलगा व  सून यांच्यासह कोपीत राहत होता. संसाराचा गाडा चालवण्यासाठी ते ऊसतोडणीचेही काम करत होते.  मंगळवारी (२१) रोजी राहत्या कोपीतील बल्लीला  दोरीच्या साह्याने गळफास लावून घेतल्याचा अंदाज आहे. शेजारच्या मदतीने त्यांना  खाली उतरून घेऊन उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण  रूग्णालयात दाखल केले.पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
 दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले  नाही या प्रकरणी विजय भानुदास ताजणे धामोरी यांनी दिलेल्या खबरीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादंवी कलम १७४ प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ. संदीप बोठे हे करीत आहेत

Leave a Reply

You cannot copy content of this page