कोपरगांव पिपल्स बँकेचे अध्यक्ष कैलासचंद ठोळे तर उपाध्यक्ष भाऊसाहेब लोहकरे 

कोपरगांव पिपल्स बँकेचे अध्यक्ष कैलासचंद ठोळे तर उपाध्यक्ष भाऊसाहेब लोहकरे 

Kailaschand Thole is the president of Kopargaon People’s Bank and Bhausaheb Lohkare is the vice president

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed22 Feb23 ,17.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगांव पिपल्स बॅकेचे अध्यक्ष कैलासचंद ठोळे तर उपाध्यक्ष भाऊसाहेब लोहकरे विरोध बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली 

कोपरगांव पिपल्स को – ऑप . बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षीक निवडणूकीनंतर चेअरमन व व्हा . चेअरमन पदाचे निवडीकरीता झालेल्या सभेत . अध्यक्ष पदाकरीता कैलासचंद भागचंद ठोळे यांचे नावाची सुचना कल्पेश जयंतीलाल शहा यांनी मांडली त्यास अतुल धनालाल काले यांनी अनुमोदन दिले . तसेच उपाध्यक्ष पदाकरीता भाउसाहेब शंकरराव लोहकरे यांचे नावाची सुचना रविंद्र रतनचंद ठोळे यांनी मांडली त्यास राजेंद्र मोतीलाल शिंगी यांनी अनुमोदन दिले . अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता एक एकच अर्ज आल्याने त्यांची एकमताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री एन.जी. ठोंबळ यांनी जाहिर केले . 
बॅकेचे अध्यक्ष कैलासचंद ठोळे हे गत ४५ वर्षांपासून बँकेचे संचालक पदावर असुन त्यांनी सन १९८२-८३ मध्ये व्हा . चेअरमन पद व सन १९९२  व २००९-१० मध्ये चेअरमन पद यापुर्वी भुषविलेले आहे . कैलासचंद ठोळे हे कोपरगांवातील प्रसिध्द उदयोगपती असुन त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर डी. आर. मेहता यांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या  अग्रीकल्चर व फर्टीलायझर डिलर्सचे कर्जसमितीवर सदस्य म्हणून दोन वर्ष , महाराष्ट्र फर्टीलायझर अण्ड पेस्टीसाईड डिलर्स असो . राज्यव्यापी संघटना , पुणे या संस्थेचे २७ वर्ष अध्यक्षपदी , मध्य रेल्वेचे कन्सल्टीव्ह समीती वर दोन वर्ष , जिल्हा नागरी बँक असो . चे चेअरमनपदी , ऑल इंडिया प्लॉस्टीक मॅन्यु .असो . मुंबईचे संचालकपदी , फर्टीलायझर   अडव्हायजरी फोरम , नई दिल्ली चे सदस्य असे विविध क्षेत्रातील पदांवरील कामकाजाचा अनुभव त्यांना आहे. कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे विदयमान अध्यक्षपदाचा कार्यभारही ते सांभाळत आहे . त्यांचा बॅकींग क्षेत्रातील तसेच उदयोग क्षेत्रातील कामकाजाचा अनुभव निश्चीतच बॅकेचे प्रगतीस मार्गदर्शक ठरणार आहे . तसेच उपाध्यक्ष भाऊसाहेब लोहकरे हे कोपरगांवातील प्रसिद्ध व्यापारी असुन कोपरगांव तालुका खादी ग्रामोदयोग संघ येथे पाच वर्ष संचालक पदावर कार्यरत राहिलेले आहे .
बँकेचे नुकतेच झालेल्या पंचवार्षीक निवडणूकीत पुढील उमेदवार विजयी झाले आहेत . सुनिल कंगले , रविंद्र लोहाडे , कल्पेश शहा , धरमचंद बागरेचा , अतुल काले , राजेंद्र शिंगी ,सुनिल बंब , सत्येन मुंदडा , रविंद्र ठोळे , सुनिल बोरा , दिपक पांडे , हेमंत बोरावके , वसंतराव आव्हाड , प्रतिभा शिलेदार , त्रिशला गंगवाल सदरचे संचालक सभेस उपस्थित होते . बँकेचे मावळते चेअरमन सत्येन मुंदडा व व्हा . चेअरमन प्रतिभा शिलेदार यांनी त्यांचे कार्यकाळात संचालक व सेवकांनी केलेल्या सहकार्याबददल आभार व्यक्त केले . सहकार अधिकारी ए. आर. रहाणे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे , असि . जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड, सिनी. ऑफीसर विठ्ठल रोठे उपस्थित होते शेवटी  नगर जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी प्रदीप नवले यांनी बँकेचे सेवकांचे व युनियनचे वतीने सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार केला .
चौकट
सदर बँकेचे भाग भांडवल रु ६कोटी ५६ लाख स्वनिधी ३७ कोटी २० लाख , ठेवी २७४ कोटी ७३ लाख , कर्जे १५१ कोटी ९१ लाख , गुंतवणूक १५२  कोटी ३९ लाख , ग्रॉस एनपीए ४.४८ टक्के . नेट एनपीए शुन्य टक्के असुन सतत ऑडीट वर्ग अ प्राप्त आहे तसेच सभासदांना १५ टक्के लाभांश देणारी अ.नगर जिल्हयातील एकमेव बँक आहे .  

Leave a Reply

You cannot copy content of this page