अल्पवयीन मुलीवर अत्याचार गुन्हा दाखल आरोपी अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार गुन्हा दाखल आरोपी अटक

Accused arrested for molesting a minor girl

सदर घटना धामोरी येथे २३ फेब्रुवारी रोजी  घडली आहे.The said incident took place in Dhamori on 23rd February.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat25 Feb23 ,18.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव  : सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून धमकावणाऱ्या आरोपी विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटना २३ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आरोपीत याने मुलीला तुझेशी बोलायचे आहे व काहीतरी सांगायचे आहे,माझे सोबत चल, असे खोटे बोलून फिर्यादीस आरोपी  याने त्याचे मोटारसायकलवर बसवुन धामोरी येथील यशोदा इंग्लीश स्कूलजवळ नेऊन फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देवुन, तिचे  तोंड दाबून व  तिचे  इच्छेविरुध्द् बळजबरीने शरीर संबंध केले आहे.
  आरोपी हा पीडित मुलीच्या परिचयाचा होता. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने सदर अल्पवयीन मुलीच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन धमकी देऊन जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.
याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी  मुस्तफा जब्बार खाटीक रा.धामोरी ता. कोपरगांव याचे विरोधात  गु.र.नं. १००/२०२३ भा.दं.वि. कलम ३६३, ३७६ (२) (एन),५०६,बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO)अधिनियम, २०१२ चे कलम ४,६,८,१२प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक  करण्यात आली आहे.
दरम्यान संजय सातव सो.उपविभागीय पोलीस  अधिकारी    शिर्डी  विभाग शिर्डी यांनी भेट दिली असून आढावा घेतला आहे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सपोनी सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page