छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतर ऐतिहासिक निर्णय ; केंद्र व राज्य सरकारचे आभार- स्नेहलता कोल्हे
Chhatrapati Sambhajinagar, Dharashiv Rename Historical Decision; Thanks to Central and State Govt.- Snehalata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat25 Feb23 ,18.10 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली, हा ऐतिहासिक निर्णय आहे. शिंदे -फडणवीस सरकारने दिलेला शब्द पाळला. छत्रपती संभाजीनगर व धाराशिवच्या नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार, भाजपा प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी मानले आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! असे नामकरण करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. युती सरकारने दिलेला शब्द तडीस नेला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या शहराच्या नामांतरणावरून आरोप करणाऱ्या वाचाळवीरांंना मोठी चपराक बसली आहे, असाही टोला त्यांनी लगावला.
आठ महिन्यांपूर्वी युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले. त्यानंतर मंत्रिमंडळात दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता तसेच यासंदर्भात विधिमंडळात देखील ठराव संमत झाला होता असा उल्लेख प्रदेश सचिव सौ कोल्हे यांनी केला.
केंद्र व राज्य सरकारचे या निर्णयाचे सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी स्वागत केले आहे
चौकट
औरंगाबाद शहराला संभाजीनगर नाव देऊन केंद्र व राज्य सरकारने हा अतुलनीय पराक्रमी संभाजी महाराजांचा यथोचित गौरव केला असून, महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवली आहे, सौ स्नेहलता कोल्हे.
Post Views:
156