उत्तर विभाग प्रगतीसाठी सर्वांना विश्वासात घेवून निर्णय घेणार- आ. आशुतोष काळे वृत्तवेध ऑनलाईन 25 July  2020

उत्तर विभाग प्रगतीसाठी सर्वांना विश्वासात घेवून निर्णय घेणार- आ. आशुतोष काळे

वृत्तवेध ऑनलाईन 25 July  2020

By: Rajendra Salkar 

कोपरगाव : उत्तर विभागाचे प्रगतीसाठी सर्वांना विश्वास घेवून निर्णय घेणार असल्याचे प्रतिपादन रयतचे उत्तर विभाग अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्याअध्यक्षतेखाली पार पडलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्स मिटिंगमध्ये संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत दिली आहे.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्याप्रमाणे माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फुलविला तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांनुसार कामकाज करून
उत्तर विभागाची जबाबदारी पार पाडणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी बैठकीत दिली आहे.

सर्व विभागीय अध्यक्ष, विभागीय अधिकारी, सहाय्यक विभागीय अधिकारी यांची सन २०२०/२१ मधील पहिली ऑनलाईन बैठक संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत आ. काळे यांनी संस्थेत स्थानिक परिस्थितीत येणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी सर्वांसोबत विचारविनिमय करूनच या अडचणी सोडवू. शाळेच्या प्रवेशाबाबत शासनाचे व संस्थेच्या धोरणानुसार कार्यवाही करू. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अर्धवेळ (तासिका) सेवक तसेच वसतिगृहाच्या असलेल्या अडचणी मार्गी लावू. अटल टिकरिंग लॅब व्यवस्थाचे नीती आयोग भारत सरकार यांचे मार्फत ५५ शाखांना अनुदान मंजूर असून त्यापैकी २५ शाखांना ते मिळालेले असून उर्वरीत ३० शाखांना अनुदान मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा मान्यतेचे प्रस्तावामध्ये ३ मराठी माध्यम,४ इंग्रजी माध्यमांचे मान्यतेसाठी शासनस्तरावर प्रयत्न करू. असेही ते शेवटी म्हणाले.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page